30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयकिरीट सोमय्यांचा धक्कादायक खुलासा; देशमुख-मलिकांनंतर आता नंबर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा

किरीट सोमय्यांचा धक्कादायक खुलासा; देशमुख-मलिकांनंतर आता नंबर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक ययांना ईडी कढून अटक करण्यात आली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी आपले पडसाद उमटवले आहे. मात्र यांच्या अटकेनंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अजून महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावं जाहीर केली असून आता यांचा नंबर लवकरच असे म्हंटले आहे.(Shocking revelation of Kirit Somaiya, Sharad Pawar and Uddhav Thackeray)

नुकतेच माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला,  देशमुख-मलिकांनंतर अटकेसाठी कोणाचा नंबर? यावर किरीट सोमय्या यांनी चेंडू शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले आहे. पुन्हा पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर? त्यावर किरीट सोमय्या म्हणतात, त्यासाठी चिट्ठीच काढावी लागेल, म्हणजे चिट्ठीतून ठरवता येईल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना आधी तुरुंगात पाठवायचे.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले,मी काय संजय राऊत नाही. चणेवाल्याकडे जाऊन दोन ट्रक रद्दीचे पेपर घेऊन जाणार. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचं नाव संजय राऊत सांगू शकले नाही. कुठे आहे वाधवान? असे फडतूस नाटकं, नौटंकी उद्धव ठाकरेंची माणसं करतात, आम्ही सर्व पाठपुरव्या सहित बोलतो.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता,किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप

वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा? किरीट सोमय्यांचा राऊतांना टोला

पवारांच्या जावयांकडे इतके पैसे कसे ? किरीट सोमय्यांचा सवाल

‘Dirty dozen’ would be behind bars soon: Kirit Somaiya Read more at: https://www.deccanherald.com/national/west/dirty-dozen-would-be-behind-bars-soon-kirit-somaiya-1084641.html

देशमुख-मलिकांनंतर तुरुंगात जाण्यासाठी आता हे ‘डर्टी डझन’ रांगेत उभे आहेत असे किरीट सोमय्या म्हणाले. मविआचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर करतो. त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या ‘डर्टी डझन’मध्ये, अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब,

संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी,आनंद आडसुळ,अजित पवार, हसन मुश्रीफ,प्रताप सरनाईक रविंद्र वायकर ,जितेंद्र आव्हाड यांचा समावेश असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी