29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeशिक्षणबारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये थोडा फेरबदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला

बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये थोडा फेरबदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला

टीम लय भारी

मुंबई: बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये थोडा बदल करण्यात येत आहे असे समजले गेले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी बोर्डानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीच्या  परीक्षा  4 मार्चपासून सुरू होणार आहे, असे नमूद केले होते.(Marathi and Hindi papers were postponed 12th examination)

 मात्र आता वेळापत्रकामध्ये थोडा बदल करण्यात येत असून बारावीचे 5 आणि 7 मार्चला होणारे पेपर हे आता 5 आणि 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे असे वेळापत्रकात नमूद केले गेले आहे.

बोर्डाने जाहीर केलेल्या या वेळापत्रकात मुख्य म्हणजे दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. नेमका बदल असा की,  5 मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता 5 एप्रिलला होणार , तर 7 मार्चला होणारा मराठीचा पेपर हा 7 एप्रिल रोजी घेण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

बारावीची परीक्षा ४ मार्च तर दहावीची १५ मार्चपासून

मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयाची भयंकर दुर्दशा, हजारो पुस्तकं खराब

अभाविप मुंबईच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये आंदोलन

Rajasthan Board Releases Class 10, 12 RBSE Exam Schedules

या दोन पेपर च्या तारखांमध्ये बदल करण्यामागचे कारण असे की, 23 फेब्रुवारीला या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. त्यामुळे हा शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे. 5 आणि 7 मार्च या तारखेला जे पेपर होते त्यातील काही प्रश्नपत्रिका या जळून खाक झाल्या आहेत.  त्यामुळे बोर्डाने बैठक घेऊन या दोन विषयाचे पेपर पुढे ढकलले आहेत.

आणि दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच होणार याबाबतची माहिती राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी