35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयभाजप नेते बाबूल सुप्रीयो यांचा राजकारणाला रामराम

भाजप नेते बाबूल सुप्रीयो यांचा राजकारणाला रामराम

टीम लय भारी
भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रीयो यांनी शनिवारी राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचबरोबर ते खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. (Supriyo babul decided to leave bjp)

भाजपा सरकारशी काही प्रमाणात मतभेद असल्याने व मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने अंशतः हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सुचवले. 2014 पासून मोदी सरकारच्या कारकिर्दीत एम ओ एस म्हणून अनेक खाती त्यांनी सांभाळली. परंतु या महिन्यात कॅबिनेट मध्ये काही फेरबदल करण्यात आले व त्यात त्यांना वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर सदा सरवणकर यांचं प्रतिउत्तर

Supriyo
भाजप नेते बाबूल सुप्रीयो यांचा राजकारणाला रामराम

समुद्रकिनाऱ्यावर महिलेचा मृतदेह

मी माझ्या आई वडिलांशी, पत्नी तसेच मिंत्रांशीही बोललो आणि त्यानंतरच हा निर्णय घेतल्याचे सुप्रीयो यांनी सांगितले. मला कोणीही कुठेही पद देऊ केलेले नाही, मी कोणत्याही इतर पक्षात जात नाही. टीएमसी, काँग्रेस, सीपीआयएम कुठेच नाही. मी खिलाडू वृत्तीचा आहे, एकाच संघाशी प्रामाणिक राहीन. मी आजपर्यंत फक्त भाजपा पश्चिम बंगाललाच पाठिंबा दिला आहे. असे सुप्रीयो फेसबुक पोस्ट मध्ये म्हणाले.

मंत्रीपदावर असताना कित्येकांना मी मदत केली, कित्येकांचा रोष ओढवून घेतला, काहींना निराश केले. माझ्याबद्दल के विचार करावा हे लोकांनी ठरवायचे आहे. त्यात मी काही बोलू शकत नाही.

शिवसेना भवनावर वादग्रस्त बोलणाऱ्या प्रसाद लाड यांच्यावर उदय सामंतांचा हल्लाबोल

Amid widening rift between Shiv Sena & BJP, Uddhav showers praise on Gadkari

या अनेक मंत्र्यांमध्ये असनसोल चे दोन खासदार सुद्धा होते. त्यांना 7 जुलै रोजी मंत्रिमंडळातून वजा करण्यात आले होते. तृणमूल काँग्रेसच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अरुप बिश्वास यांच्याविरोधात लढण्यात अपयशी झाले. सुप्रीयो यांच्यासोबत देबश्री चौधरी यांनीही मंत्रिपद सोडले.

त्याचबरोबर इतर चार खासदार याना समाविष्ट करून घेण्यात आले. विधानसभा निवडणुकांपासून भाजपा सोबत मतभेद होते, काही प्रमाणात या साऱ्या गोष्टींचा संबंध माझ्या राजकारण सोडण्याच्या निर्णयात आहे. यावर दिलीप घोष यांनी टिप्पणी देण्यास नकार दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी