33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय"लोढा यांनी आपली बुद्धी खर्ची घालावी"; 'त्या' प्रस्तावावरून सुषमा अंधारेंचे खडे बोल

“लोढा यांनी आपली बुद्धी खर्ची घालावी”; ‘त्या’ प्रस्तावावरून सुषमा अंधारेंचे खडे बोल

विधवा महिलांना जगण्याचा नैतिक अधिकार कसा प्राप्त होईल यावर आपली बुद्धी लोढांनी खर्ची घालावी असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.

राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी (गं. भा) हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी, असा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयावर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांनी टीका केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर मंगल प्रभात लोढांना फार सुनावलं आहे.

विधवा महिलांना समाजात जगण्याचा नैतिक अधिकार कसा प्राप्त होईल यासाठी लोढा यांनी आपली बुद्धी खर्ची घालावी. बाकी आम्ही सगळ्याच महिला, आमच्या ज्या अशा महिला किंवा भगिनी आहेत, माता आहेत त्यांनी काय नावं लावायची ते बघून घेऊ. त्यासंदर्भातल लोढांनी फार लोड घेऊ नये. महिलांबाबत वारंवार भाजपा नेत्यांकडून चुकीचं विधानं केली जात आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलणार आहेत का? हे सगळं गांभीर्याने घेणार आहेत का असाही प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे. दररम्यान महिला आणि बालविकास या खात्याला महिला मंत्री नाहीत त्यामुळे अशा गोष्टी होणार ना. विधवा महिलांना गंगा भागिरथी म्हणायचं मग विधुर पुरुषांना म्हसोबा माळ म्हणणार का? असा फाजीलपणा करणं मंगल प्रभात लोढांनी टाळलं पाहिजे असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडेंचाही सवाल
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील गंगा भगिरथी या शब्दावरून आक्षेप घेतला आहे. आपल्या संस्कृतीत कुणीही थेट विधवा म्हणतच नाहीत. गंगा भगीरथीच म्हणतात. पण शासनाचा नियम आला असेल तर मग पत्नी वारलेल्या पुरुषांना काय म्हणायचं.. असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलाय.
विधवा महिलांना अशा प्रकारे विशेषण लावल्यानंतर त्यांची ओळख जाहीर केली जाईल, असा आक्षेप राज्यातील महिला संघटनांनी घेतलाय. विविध ठिकाणच्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी यावरून तीव्र संताप व्यक्त केलाय.

अंतिम निर्णय चर्चेनंतरच…
मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, याबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या फक्त प्रस्ताव तयार करून चर्चा करण्याची सूचना प्रधान सचिवांना केली आहे. मात्र चर्चेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

हे सुद्धा वाचा: 

मंगलप्रभात लोढा यांच्या ‘विधवा नामकरण’ प्रस्तावाला महिला संघटनेचा आक्षेप

भक्तांची चॉईस किती फडतूस; सुषमा अंधारे यांची पोस्ट चर्चेत

संजय शिरसाठ विकृत आमदार : सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

Sushma Andhare, mangal prabhat lodha, widows proposal, Sushma Andhare used harsh words to mangal prabhat lodha on widows proposal

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी