29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिस्तूप म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत
Array

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिस्तूप म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत

आपल्या देशाच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात डॉ. भीमराव आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. डॉ. आंबेडकर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. देशाच्या प्रत्येक नागरिकाला भारताची राज्यघटना बनवण्यात त्यांची भूमिका आणि प्रयत्न आठवतात. दरवर्षी देशात डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती आनंदाने साजरी करते. नेहमीप्रमाणे, आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी येत आहे. आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती असून, आजही ते करोडो भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या अनुयायांकडून आजही या महामानवाची प्रत्येक आठवण, त्यांनी वापरलेल्या वस्तू मौल्यवान ठेवा म्हणून जतन केले जात आहे. महापरिनिर्वाणानंतर काही मोजक्याच अनुयायांकडे महामानवाच्या अस्थी जपून ठेवण्यासाठी देण्यात आल्या होत्या. त्यात नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंप्री, आडगावसह शहरातील रमाई आंबेडकर शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ बाबासाहेबांच्या अस्थींचे स्मारक स्तूप उभारण्यात आले आहे. हे स्तूप प्रत्येक अनुयायीसाठी प्रेरणास्थान बनले आहे.

सय्यद पिंप्री स्तूप स्मारक अनुयायासाठी प्रेरणास्थान तसेच अखंड ऊर्जेचे स्रोत ठरत आहे. 14 येथील पी. एल. लोखंडे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक होते, लोखंडे आणि बाबासाहेबांमध्ये खूप सख्य होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थी जपून ठेवण्याचे भाग्य लोखंडे यांना लाभले. मुंबईच्या चैत्यभूमीत 1971 मध्ये बाबासाहेबांच्या अस्थींचे स्मारक बांधण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच म्हणजे 1958 मध्येच सय्यद पिंप्री येथे लोकवर्गणीतून स्मारक उभारण्यात आले होते. महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे पहिले स्तूप स्मारक सय्यद पित्रीचे ठरले. तत्कालीन खासदार दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते येथील स्मारकाचे उद्घाटन झाले होते. या सोहळ्याला आंबेडकरांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांची विशेष उपस्थिती होती. मुकुंदराव आंबेडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेले बोधिवृक्ष आजही या ठिकाणी आहे.

Dr. Ambedkar Jayanti : महामानवाचे अस्थिस्तूप ठरताहेत अखंड ऊर्जेचा स्रोत | पुढारी

रमाई कन्या विद्यालयातील ‘चैतन्य स्तूप’

जुना आग्रा महामार्गावरील रमाई कन्या नाशिक शहरातील विद्यालयातील चैतन्य स्तूप आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. बाबासाहेब आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. बाबासाहेबांच्या अखेरच्या प्रवासापर्यंत दादासाहेब त्यांच्यासोबत होते. महापरिनिर्वाणानंतर दादासाहेबांनी बाबासाहेबांचा अस्थिकलश नाशिकमध्ये आणला. दादासाहेबांच्या निधनानंतर कर्मयोगिनी डॉ. शांताबाई दाणी यांनी बाबासाहेबांच्या अस्थींचे जतन करत ‘चैतन्य स्तूप उभारले 14 एप्रिल 1995 रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी, 24 डिसेंबर 1992 रोजी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी स्तूपला सदिच्छा भेट दिली होती, याच ठिकाणी बाबासाहेबांच्या ड्रेस, बूट टोपी आदी साहित्यांचेही जतन करण्यात आले आहे.

Dr. Ambedkar Jayanti : महामानवाचे अस्थिस्तूप ठरताहेत अखंड ऊर्जेचा स्रोत | पुढारी

Dr. Ambedkar Jayanti, Dr. Babasaheb Ambedkar’s Asthi Stupa is a source of eternal energy

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी