35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयराज्यातील शाळांबाबत ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील शाळांबाबत ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

टीम लय भारी

ठाकरे सरकार कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येतेय.. त्यासाठीच्या हालचाली शासनाने सुरु केल्या आहेत.या शाळ बंद केल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे(Thackeray government’s important ruiling regard schools in the state)

तसेच त्यांच्या वाहतुकीची व्यवस्थाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले..

खासदार इम्तियाज जलील यांची सरकारला ऑफर, मुस्लिम आरक्षण दिलं तर महापालिका निवडणुका लढणार नाही!

अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

दरम्यान, भाजप-शिवसेना युती सरकार असतानाच कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा विचार सुरु झाला होता. शासकीय खर्चात बचत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यावेळी विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नेत्यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली होती.

दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकारनेच युती शासनाच्या पावलावर पाऊल ठेवत 10 किंवा 20 पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. नगर, अमरावती, पालघर, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, नाशिक, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यातील शाळांचा त्यात समावेश असल्याचे समजते.

त्यांच्या पक्षाच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ?: राज ठाकरे

Time for political parties to make climate change election agenda, says Aaditya Thackeray

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शाळांचे क्‍लस्टर तयार करावे लागणार आहे. त्यातून शाळा बंद करण्याचे धोरण राबवले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 3187, तर शहरी भागातील 464 शाळा बंद होणार आहेत. त्याचा फटका 16 हजार 334 मुलांना बसणार आहे. दरम्यान, सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत असले, तरी त्याला आतापासूनच विरोध सुरु झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी