राजकीय

उच्च अधिकाऱ्याची दृष्टी अधू; धनादेश होताहेत बाऊन्स, आदेशांवर चुकीच्या स्वाक्षऱ्या; तरीही खुर्ची सोडवेना

टीम लय भारी

मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक व्यंगावर टिप्पणी करू नये असे नैतिक शास्त्र सांगते. परंतु आपल्या शारीरिक अक्षमतेमुळे गंभीर कामांच्या तिनतेरा वाजत असतील, लाखो लोकांना त्याचा फटका बसत असेल तर अशा व्यक्तीने स्वतःहूनच अशी कामे टाळली पाहिजेत. परंतु राज्य सरकारमधील एका अधिकाऱ्याने तितके सौजन्य दाखवण्याचे भान ठेवलेले नाही.

जबाबदाऱ्यांचा सत्यानाश झाला तरी चालेल, पण ‘मलईदार’ पद सोडणार नाही, असा हट्ट या अधिकाऱ्याने धरला आहे. धनराज माने असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. उच्च शिक्षण संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.

राज्यभरातील सर्व वरिष्ठ महाविद्यालये माने महाशयांच्या अखत्यारीत येतात. पण गेल्या काही दिवसांत माने यांची दृष्टी अधू झाली आहे. समोर आलेल्या व्यक्तीला ते ओळखूनही शकत नाहीत. कागदावर लिहिलेले त्यांना वाचता येत नाही.

कागदावर, धनादेशावर स्वाक्षरी करताना कनिष्ठ कर्मचारी त्यांचा हात हातात धरून स्वाक्षरीच्या ठिकाणी नेवून ठेवतात. दुसऱ्याच्या मदतीनंतरही ते चुकीच्या ठिकाणी स्वाक्षरी करतात.

काही दिवसांपूर्वी एक जाहीर कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व उच्च – तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालकांनी ‘धनराज माने हे छगन भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करतील’ असे पुकारले. माने हे एका मदतनिसाकरवी व्यासपीठाच्या पुढे आले. पण पुष्पगुच्छ मात्र त्यांनी उदय सामंत यांना दिला.

छगन भुजबळ व उदय सामंत अशा दोघांचाही चेहरा त्यांना ओळखता आला नाही.
दृष्टी अधू झाल्यामुळे धनराज माने यांच्याविषयी लोकांकडून सद्भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या या अवस्थेबद्दल अनेकांचे हृदय सुद्धा गलबलून येत आहे. परंतु माने यांनी सुद्धा इतक्या महत्वाच्या जबाबदार पदावर हट्टाने चिटकून राहण्याची गरज नाही. कमी काम असलेल्या अन्य दुसऱ्या पदावरही ते स्वतःची बदली करून घेऊ शकतात.

संचालक हे पद केवळ मलईदार आहे. डोळे अधू असले तरी या पदावर राहूनच ‘लक्ष्मी’दर्शन होऊ शकते हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते खूर्चीला चिटकून राहिले आहेत. ‘लक्ष्मी’दर्शनाच्या हट्टापायी ‘सरस्वती’वर अन्याय होत असल्याची बाब त्यांनी लक्षात घ्यायला हवी, अशी भावनाही शिक्षण क्षेत्रातील घटकांकडून व्यक्त केली जात आहे.

वास्तवात, वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारी व्यक्तीला ती शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम आहे की नाही याची तपासणी केली जाते. अशी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असेल तरच तिला त्या क्षमतेचे काम दिले जाते. परंतु धनराज माने यांच्या बाबतीत सरकारची ही प्रचलित कार्यपद्धत धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसत असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा :

संजय राठोड पुन्हा मंत्रीमंडळात येण्याची शक्यता

बांठीया आयोगामधील त्रुटी दूर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आश्वासन

अबब ! मंत्री बाळासाहेब पाटील यांचा ‘गाढव’छाप कारभार; राष्ट्रवादीच्या नेत्यानेच उघडे पाडले पितळ

यंदा आयटीआय प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध

पूनम खडताळे

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

2 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

2 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

3 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

3 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

5 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

6 hours ago