35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयबाबरी मशिदीसाठी जमिनीच्या तुकड्याची गरज नाही : असदुद्दीन ओवेसी

बाबरी मशिदीसाठी जमिनीच्या तुकड्याची गरज नाही : असदुद्दीन ओवेसी

लय भारी न्यूज नेटवर्क

हैदराबाद : राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. या निर्णयावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी अचूक नाही. ही लढाई कायदेशीर हक्कासाठी होती. पाच एकर जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हती. अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

ओवेसी म्हणाले, जर बाबरी मशीद पाडली गेली नसती, तर सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला असता? असा सवाल उपस्थित केला. मी जर हैदराबादला भिक मागायला निघालो तर जमिन खरेदी करण्यासाठी मशिद बांधण्यासाठी एकटा पैसा गोळा करु शकतो. मशिदीसाठी कुणाच्या जमिनी आम्हाला गरज नाही. सुन्नी बोर्ड च्या टीमने खूप मेहनत घेतली. ते पुढे काय निर्णय घेतात मला माहित नाही असंही ओवेसी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी