31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeटॉप न्यूजनाक कापणे, गोळ्या झाडणे, दगडाने ठेचणे... वाचा तालिबान्यांची क्रूर कहाणी

नाक कापणे, गोळ्या झाडणे, दगडाने ठेचणे… वाचा तालिबान्यांची क्रूर कहाणी

टीम लय भारी

काबुल : अफगाणिस्तान तालिबानच्या अखत्यारीत गेल्यापासून तेथील स्थानकांवर अनन्वित अत्याचार होत आहेत(Afghanistan to the Taliban, there has been a spate of atrocities at stations).

अफगाणिस्तान सारख्या प्रगतीच्या वाटेवर पुढे सरकणाऱ्या देशात तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित होण्यास काही मदरशांनी मदत केल्याचे समजते. मदरसा म्हणजे धार्मिक शिक्षण देण्याऱ्या शैक्षणिक संस्था.

‘नरेंद्र मोदींकडे भीक मागत नाही’

‘वडील मजुरी करतात, अमेरिकेतील शिक्षणाचा विचारही केला नव्हता’

Afghanistan
शिक्षा म्हणून पतीने आयशाचे नाक आणि दोन्ही कान कापून टाकले.

अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करण्यात आला. त्या कायद्यान्वये तालिबान जनतेवर अमानुष अत्याचार करू शकतो. तालिबानी या कायद्याचा वापर करून टोकाच्या शिक्षा तेथील माणसांना देत आहेत.

1927 साली अफगाणिस्तानच्या राणीने स्रीस्वातंत्र्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि नव्या नियमांचा पायंडा घालून दिला. राणी सोराया तार्जी हिने आपला बुरखा काढून फेकून दिले. स्त्रियांनी पडद्यात न राहता पिरुषांप्रमाणेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरले पाहिजे असे तिचे विचार होते.

त्याचबरोबर पुरुषांनी अनेक लग्ने न करता एकपत्नी व्रत ठेवावे. 1919 साली अमानुल्ला खान याने अफगाणिस्ताची सत्ता सांभाळली होती. त्याची पत्नी सोराया तार्जी हिने हे नवीन नियम घालून दिले. त्यानंतर अफगाण जनतेने त्यांचा स्वीकार केला. रूढी आणि परंपरेत आकंठ बुडून गेलेल्या या धर्माचा पगडा असलेल्या देशात नवे नियम पचविणे कठीण होते परंतु अमानुल्ला खान आणि राणी सोराया यांनी देशाच्या प्रगतीच्या वाटा खुल्या केल्या होत्या.

1920 मध्ये मुलींसाठी शाळा सुरू करण्यात आली त्यानंतर 1996 पासून तालिबानने अफगाणिस्तानात आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. म्हणून राणीला शाही कुटुंबासोबत अफगाणिस्तान सोडून जावे लागले. शरिया कायदा लागू केला गेला आणि स्रीजन्म म्हणजे जिवंतपणीच नरकयातना अशी परिस्थिती झाली.

वाढदिवसानिमित्त मलायका अरोराचा महिलांना खास फिटनेसमंत्र

LIVE NOW AUTO REFRESH AUGUST 24, 2021 / 02:23 PM IST Afghanistan-Taliban Crisis LIVE Updates: Ukrainian govt denies hijacking of any evacuation plane, say reports

यावेळची एक गोष्ट आहे आयशाची. आयशा हिचे लग्न पंधराव्या वर्षीच करण्यात आले. जाच सहन न झाल्याने तिने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. तिला पकडून पुन्हा तिच्या पतिकडे सोपविण्यात आले. त्यावेळी शिक्षा म्हणून पतीने आयशाचे नाक आणि दोन्ही कान कापून टाकले.

2021 च्या एप्रिल मधली ही घटना आहे. तालिबानी एका घरात घुसले आणि तेथील महिलेस जेवण करणयास सांगितले. महिलेने केलेले जेवण न रुचल्यामुळे तालिबान्यांनी त्या महिलेस अग्नीच्या हवाली केले व मृत्युदंड दिला.
अशाप्रकारे अमानुष अत्याचार करणाऱ्या तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी