29 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीयअनिल परब यांच्यावर सीबीआय चौकशी लावावी - आशिष शेलार

अनिल परब यांच्यावर सीबीआय चौकशी लावावी – आशिष शेलार

टीम लय भारी

मुंबई : भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत ( सीबीआय) चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. नारायण राणे यांना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव आणल्याचा आरोप शेलारांनी केला (Aashish Shelar demanded to set CBI against Anil Parab).

अनिल परब दूरध्वनीवरून संशयास्पद बाबी बोलत असल्याची ध्वनी फीत समोर आली होती. शेलार म्हणाले अनिल परब काल रात्री 11 ते 1 वाजता रत्नागिरी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीत होते. त्यावेळी परब एका आयपीएस अधिकाऱ्याला दूरध्वनीवरुन नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश देत असल्याचे ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाले आहे.

इंदिरा गांधींमुळे अमिताभ बच्चन यांच्यावर मीडियाने 15 वर्षांसाठी टाकला होता बहिष्कार

भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमक्या

Ashish Shelar demanded that CBI be set up against Anil Parab
अनिल परब दूरध्वनीवरून संशयास्पद बाबी बोलत असल्याची ध्वनी फीत समोर आली

या ध्वनिचित्रफीतमध्ये परब उच्च न्यायालयाने राणेंचा जामीन अर्ज फेटाळला असे सांगत आहेत. त्या वेळी राणे यांची जामीन सुनावणी सुरू झाली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी असे शेलार म्हणाले.

‘निलम गोऱ्हे, अनिल परब यांना न्यायालयात खेचणार’

maharashtra: BJP’s Ashish Shelar claims involvement of Sena minister Anil Parab in Narayan Rane’s arrest; seeks CBI probe

तसेच परब गृहमंत्री नसतानाही गृहखात्यात हस्तक्षेप करत आहे असे शेलार म्हणाले. त्याचबरोबर अनिल परबांच्या गृहखात्यात हस्तक्षेप करण्यावरून शरद पवार यांनीही एकदा नाराजी व्यक्त केली होती असे ही शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ही यावेळी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी