35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंमुळे ठाण्यातील नगरसेवक 'बेडूक उड्या' मारण्याच्या तयारीत

एकनाथ शिंदेंमुळे ठाण्यातील नगरसेवक ‘बेडूक उड्या’ मारण्याच्या तयारीत

टीम लय भारी

ठाणे : महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्यावर अखेर १५ दिवसांनी पडदा पडला. सेनेसोबत बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या मागोमाग अनेक शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंची वाट धरली. शिवसेनेतील ४० आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे आता ठाण्यात शिवसेनेला खूप मोठे भगदाड पडले आहे. पण शिवसेना पक्षाला लागलेली ही गळती काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.

ठाण्यामध्ये शिवसेना पक्षाला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवकांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र्र’ केला आहे. या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेच्या ब गटाला आपला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाण्यात आता शिवसेना पूर्णतः: कोसळली आहे. सेनेच्या ६६ आमदारांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे हे सर्व नगरसेवक आता शिंदेंच्या ताफ्यात सहभागी झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंमुळे बरेचशे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे बेडूक उड्या मारण्याच्या तयारीत आहेत, असेच सध्या दिसून येत आहे. ज्या पक्षाने मोठे केले, त्या पक्षाच्या विचारांना मागे सारून स्वतःच्या स्वार्थीसाठी आमदार, नगरसेवक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडत आहेत. पण शिवसेनेचे कार्यकर्ते आजही आपण बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेसोबत कायम असू असे सांगत आहेत.

हे सुद्धा वाचा :

शहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले

बंडखोर सेना आमदाराला मुंबईत आल्यानंतर चार दिवसांनंतर दिसला मतदारसंघ!

फडणवीस-शिंदे भेटीचे गुपित मिसेस फडणवीसांनी केले उघड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी