29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयमनसे सोबत युतीवर फडणवीसांचे सूचक विधान

मनसे सोबत युतीवर फडणवीसांचे सूचक विधान

टीम लय भारी

मुंबई :- येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार सुरुवात केली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये युती होतांना दिसून येत आहे. तसेच आता मनसे आणि भाजप मध्ये युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे (Fadnavis suggestive statement on alliance with MNS).

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीहून नागपूरला दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर येताच मीडियाने त्यांच्या भोवती गराडा घातला. यावेळी त्यांना मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

चीनच्या मुद्यांवरून राहुल गांधींनी मोदींना लगावला खोचक टोला

प्रणिती शिंदेंची मोदींवर बोचरी टीका; मोदी मीडियासमोर यायला घाबरतात

त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का? या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मनसेने परप्रांतीयांबाबतचा मुद्दा सोडला तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मनसेसोबत युती करण्याचा निर्णय योग्यवेळी होईल. अजून त्याला वेळ आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असेही फडणवीस म्हणाले (Fadnavis also said that with a partial understanding).

Fadnavis suggestive statement on alliance with MNS
देवेंद्र फडणवीस

टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट; व्हिलेजमध्ये एक कोरोना संक्रमित

BJP’s Devendra Fadnavis Taunt To Maharashtra Coalition On Assembly Speaker’s Election

यानंतर फडणवीस म्हणाले, केंद्रात कामे असतात त्यासाठी जावे लागते त्याचा राजकीय अर्थ काढू नये, असे सांगतानाच केंद्रात नवीन मंत्री झाले आहेत. त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच ओबीसी आरक्षणाचा अधिकार हा राज्यालाच आहे. केंद्राला नाही, असेही फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्यास त्यांच्यात युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी