33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयशरद पवारांना सर्व फुकट पाहिजे; निलेश राणे

शरद पवारांना सर्व फुकट पाहिजे; निलेश राणे

टीम लय भारी

मुंबई :- राज्य सरकार आपलं आहे म्हणून मनात येईल तस पवार वागत आहेत. पवारांना सगळं फुकट पाहिजे,  मग कितीही वाट लागली तरी चालेल पण पवार घुसणारचं. अशी घणघात टीका भाजप महाराष्ट्र सचिव निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर केली आहे (Nilesh Rane has made such harsh criticism on Sharad Pawar).

बालवेड स्टेडियम रनिंग ट्रॅकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा शरद पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी गाड्या पार्क केल्या होत्या. त्यामुळे हे रनिंग ट्रॅक घराब झाले आहे. यासंदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, महाराष्ट्र बापाचा माल असल्यासारखा MVA सरकार वापरत आहेत. बालेवाडी स्टेडियम रनिंग ट्रॅकवर पवारांच्या व मंत्र्यांच्या गाड्या पार्क, पवार कुटुंबाला सगळं फुकट पाहिजे मग वाट लागली तरी चालेल पण पवार घुसणारच. दोन कोटीचा ट्रॅक ह्या विषयामुळे वाया गेला, NCP पक्षाने नुकसानाचे पैसे द्यावे. अशा शब्दात निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे (Nilesh Rane has criticized Sharad Pawar).

ठाकरे सरकार तुमची घर वसुली वर चालतात पण… मनसेचा आक्रोश

आरक्षणाचं राजकारण करून सत्तेचा मार्ग शोधत असाल… पवारांनी लगावला टोला

क्रीडा विद्यापीठाच्या तयारी संदर्भात शनिवारी इमारतीत आढावा बैठक घेण्यात आली. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे, क्रीडा सचिव, नगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तही तेथे होते.

Nilesh Rane has made such harsh criticism on Sharad Pawar
निलेश राणे आणि शरद पवार

पुणे येथील बालवेड छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स सिटीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य स्टेडियममध्ये अ‍ॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला आहे. स्टेडियमच्या बाजूला दोन मजली इमारत आहे. इथे स्पर्धेदरम्यान वापरण्यासाठी सभागृह आहेत. अ‍ॅथलेटिक्सचा रनिंग ट्रक हा दुसऱ्या मजल्याच्या समतुल्य आहे. अशाप्रकारे या स्टेडियमची रचना केली गेली आहे.

शरद पवार, प्रशांत किशोरांच्या दिल्लीतील भेटीनंतर ‘या’ चर्चांना उधाण

VIP Cars, Including Sharad Pawar’s, At Racetrack; Kiren Rijiju Says “Sad”

या भवनमध्ये दुसऱ्या मजल्यावर बैठक रुम आहेत. त्यामुळे पवार आणि मंत्र्यांना लिफ्ट घेण्याचे कष्ट घेतले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची वाहने रनिंग ट्रॅकवर पार्क केल्या आणि कोणतेही कष्ट न घेता बैठक रूम मध्ये गेले. बैठक संपेपर्यंत वाहन ट्रॅकवर उभी होती. त्यामुळे रनिंग ट्रॅक खराब झाले आहे. याची भरपाई करणार कोण? असा सवाल निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारला आहे (This question has been asked by Nilesh Rane to NCP Sarvesarva Sharad Pawar).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी