33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजतिरंदाजीत अतनू दासचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

तिरंदाजीत अतनू दासचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

टीम लय भारी

मुंबई :- टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) भारताची सुरुवात जबरदस्त झाली. भारताचा आघाडीचा तिरंदाज अतनू दास याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत धडाकेबाज कामगिरी करत तिरंदाजीमधील कोरियन वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. अतनू दासने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला (Atanu Das made it to the semifinals).

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अतनू दास याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन्होक याला शूट ऑफमध्ये 6-5 ने पराभूत केले. या विजयासह अतनू दास याने पुरुष एकेरीमधील अंतिम 16 खेळाडूंमध्ये म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

भारतीय महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रावर होणार कारवाई

या लढतीत पहिला सेट 26-25 ने गमावल्यानंतर अतनू दासने जबरदस्त पुनरागमन केले आहे. दोन्ही खेळाडूंमधील दुसरा आणि तिसरा सेट 27-27 अशा बरोबरीत सुटला. तर चौथ्या सेटमध्ये अतनू याने बाजी मारत हा सेट 27-22 ने जिंकला. त्यानंत पाचवा सेटही 28-28 ने बरोबरीत सुटला. त्यानंतर हा सामना शूट ऑफमध्ये गेला. त्यामध्ये ओ जिन्होक याने 9 स्कोअर केला. तर अतनू याने परफेक्ट 10 चा निशाणा साधत हा सामना जिंकला.

Atanu Das defeats Olympic gold medalist semifinals
अतनू दास

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टींना इन्सायडर ट्रेडिंगच्या आरोपावर SEBI कडून 3 लाखांचा दंड

Archers Atanu Das And Deepika Kumari: Struck By Cupid’s Arrow

तसेच, तत्पूर्वी टॉप 32 फेरीत अतनू दास याने तैवानच्या डेंग यू चेंग याचा 6-4 ने पराभव केला होता. अतनू याने हा सामना 27-26, 27-28, 28-26, 27-28 आणि 28-26 अशा फरकाने जिंकला. डेंग हा यंदाच्या ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या सांघिक गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघातील नेमबाज आहे. पण त्याचा दबाव न येऊ देता अतनू याने त्याचे आव्हान परतवून लावले (But without giving in to pressure, Atanu turned down the challenge).

बॉक्सिंगमध्ये सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत

भारतीय बॉक्सरनी टोकियोमध्ये विजयी आगेकूच कायम राखली आहे. पुरुषांच्या 91 किलो हेविवेट वजनी गटात भारतीय बॉक्सर सतीश कुमार याने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनवर 4-1 ने विजय मिळवला. टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा भारताचा तो तिसरा बॉक्सर ठरला आहे. याआधी एमसी मेरीकोम आणि पूजा राणी यांनी महिलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता हे बॉक्सर पदकापासून केवळ एक विजय दूर आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी