31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजबाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून ९ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून ९ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

टीम लय भारी

संगमनेर : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यात विविध विकास कामांची गती कायम आहे. बाळासाहेबांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील नऊ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 11 कोटी 99 लाख 17 हजार रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जि. प. गटनेते अजय फटांगरे व इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे(Balasaheb Thorat’s efforts will solve the water problem of 9 villages). 

इंद्रजीत फटांगरे म्हणाले की, कोरोनाच्या संकटानंतर बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र सरकार मधून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आहे. यामधून सातत्याने वाडी-वस्तीवर विकासाचे कामे सुरू आहेत. याच बरोबर जिल्हापरिषदेच्या जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत विविध जिल्हा परिषद सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे 11 कोटी 99 लाख 17 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

अधिक माहिती देताना फटांगरे म्हणाले की, जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत तळेगाव जि.प. गटाचे सदस्य महेंद्र गोडगे यांच्या पाठपुराव्यातून तळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी 1 कोटी 92 लाख 45 हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. तर बोटा गटाचे जि. प. सदस्य अजय फटांगरे यांच्या पाठपुराव्यातून कुरकुंडी पाणी पुरवठा योजनेसाठी 1 कोटी 43 लाख 35 हजार, म्हसवंडी पाणी पुरवठा योजनेसाठी 1 कोटी 1 लाख 73 हजार रु. भोजदरी पाणी पुरवठा योजनेसाठी 1 कोटी 38 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब थोरातांनी मांडले व्हिजन २०३० !

राज्यात लवकरच वाळू स्वस्तात उपलब्ध होणार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

Maharashtra: Unhappy over neglect in government functioning and fund allocation, Congress seeks CM’s intervention

साकुर गटाच्या जि.प.सदस्य व महिला बालकल्याण विभागाच्या सभापती सौ मीराताई शेटे यांच्या पाठपुराव्यातून जांबूत बु पाणी पुरवठा योजनेसाठी 1 कोटी 39 लाख 65 हजार रुपये तर पिंपळगाव देपा पाणी पुरवठा योजनेसाठी 92 लाख 44 हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. निमोण गटाचे जि. प. सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्या पाठपुराव्यातून पारेगाव खुर्द पाणीपुरवठा योजनेसाठी 87 लाख 71 हजार रुपये तर जोरवे गटाच्या जि.प सदस्य सौ.शांताबाई खैरे यांच्या पाठपुराव्याने वाघापूर पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 3 लाख 85 हजार रुपये व पिंपरणे पाणी पुरवठा योजनेसाठी 1 कोटी 99 लाख 24 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

या योजनांच्या पाठपुरावा कामी बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित भाऊ थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेमुळे नागरिकांना वेळेत व सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. पारेगाव खुर्द, वाघापूर, जांबूत बु., पिंपरणे, कुरकुंडी, म्हसवंडी, पिंपळगाव देपा, भोजदरी ,तळेगाव दिघे यामुळे या गावांमधील नागरिक व महिला भगिनी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा शब्दांत फटांगरे यांनी बाळासाहेबांचे आभार व्यक्त केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी