33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूज...अन् भाजपच्या नेत्यांचे चेहरे उतरले

…अन् भाजपच्या नेत्यांचे चेहरे उतरले

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : आम्ही बहुमत सिद्ध करू, आमच्याकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे, शिवसेनेचे आमदार फुटणार आहेत, अशी तोंड पाटीलकी भाजपचे नेते गेले चार दिवस करीत होते. पण देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी राजीनामा देताच या सगळ्या नेत्यांचे चेहरे पडले.

फडणवीस यांनी राजीनामा दिला त्यावेळी त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राम शिंदे, विनोद तावडे, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, रवी राणा, किरीट सोमय्या इत्यादी नेते होते. या सगळ्या नेत्यांचे चेहरे कमालीचे उतरले होते. किरीट सोमय्या, गिरीश महाजन हे नेते तर प्रसारमाध्यमांपासून अक्षरशः तोंड लपवत होते. फडणवीस यांनी राजीनामा का दिला असे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विचारत असताना गिरीश महाजन लगबगीने तिथून निसटण्याचा प्रयत्न करीत होते. मला माहित नाही एवढेच ते सांगत होते. महाविकास आघाडीमध्ये एखादी महत्वाची घडामोड घडली की, आशिष शेलार लगेचच पत्रकार परिषदा घ्यायचे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात तोफ डागायचे. परंतु फडणवीस – पवार यांच्या राजीनाम्यानंतर शेलार गायबच झाले. प्रसारमाध्यमांवर ते दिसलेच नाहीत.

...अन् भाजपच्या नेत्यांचे चेहरे उतरले

ऑपरेशन लोटस व ऑपरेशन शिवतेजचे नाव घेऊन नारायण राणे, राधाकृष्ण विखे – पाटील, बबनराव पाचपुते व गणेश नाईक यांनी आमदार गळाला लावले आहेत, असे भाजपचे नेते सांगत होते. पण हे नेतेही अचानक गायब झाले. आमदार फोडण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचे काय झाले हे प्रश्नही थंड बस्त्यात गेले.

शरद पवार हेच भाजपला पाठिंबा देणार आहेत, असे बेधडक विधान अपक्ष आमदार रवी राणा यांनी केले होते. पण फडणवीस – पवार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची भाषा कमालीची सौम्य झाली होती. नव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असे ते बोलत होते.

...अन् भाजपच्या नेत्यांचे चेहरे उतरले

रात्रीच्या अंधारात सरकार बनविण्याचे कारस्थान भाजपने शिजवले, पहाटे राष्ट्रपती राजवट उठविली, सकाळी गुपचूप थपथविधी उरकला अन् या सगळ्यांसाठी राज्यपाल कार्यालयाचा यथेच्छ गैरवापर करण्यात आला. हा सगळा प्रकार जनतेला बिल्कूल आवडला नाही. या प्रकारानंतरही भाजपचे नेते आम्ही सरकार बनवू, आमच्याकडे १७० एवढे संख्याबळ असल्याचे सांगत होते. अजित पवार यांना पक्षनेतेपदावरून काढून टाकले होते. तरीही अजित पवार यांचेच पक्षनेतेपद कसे योग्य आहे असे शेलार व अन्य नेते वारंवार सांगत होते. हा सगळा प्रकार सामान्य जनतेला बिल्कूल आवडला नव्हता. भारतीय राज्य घटना, संसदिय परंपरा, राज्यपाल कार्यालय यांना भाजपने धाब्यावर बसविले होते. त्याची परिणीती अवघ्या ८० तासांत सत्तेतून पायउतार होण्यामध्ये झाली.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा, शिवसेनेवर डागली पुन्हा तोफ

…आता उद्धव ठाकरे असतील नवे मुख्यमंत्री, अजित पवारांनी घेतला राजकीय संन्यास

राजकीय भूकंप : अजित पवार यांनी राजीनामा दिला, प्रतिभाताई पवार यांच्यामुळे अजितदादांची माघार

बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेसबरोबर गेले नसते : नारायण राणे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी