33 C
Mumbai
Sunday, June 2, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेसबरोबर गेले नसते : नारायण राणे

बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेसबरोबर गेले नसते : नारायण राणे

लय भारी  न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालावर भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर ते काँग्रेसबरोबर कधीच गेले नसते. तसेच, सोनिया गांधी देखील आपली विचारसरणी सोडून शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाबरोबर जातील, असं वाटत नव्हतं. असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

राणे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने भाजपा विरोधात निर्णय दिलेला नाही. न्यायालयाने केवळ मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे उद्याचा विश्वासदर्शक ठराव भाजपा सरकार जिंकणार आहे, असा त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, शिवसेनेला संविधानाचं काही देणंघेणं नाही, त्यांच्या बोलण्याची दखल घेतली जाऊ नये, असं देखील यावेळी राणे यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने भाजपा विरोधात निर्णय दिलेला नाही. विश्वासदर्शक ठरावासंबंधी न्यायालयाने मार्गदर्शन केलं आहे. हा निर्णय म्हणजे शिवसेनेच्या बाजूने होत नाही, संजय राऊत काहीही बोलत आहेत. आनंद साजरा करा पण कायम विरोधी पक्षात राहूनच आनंद साजरा करा. न्यायालयाने दिलेला निर्णय हा भाजपाचा पराभव नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. उद्या सायंकाळी पाच नंतर विश्वासदर्शक ठरावावर जे मतदान होईल, त्यात भाजपाचे सरकार विजयी होणार अस जाहीर होईल, असा मला विश्वास आहे. राष्ट्रवादीकडून प्रयत्न जरी सुरू असले तरी, अजित पवार त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व पालन करणे आपलं काम आहे. आमचा पक्ष आणि आमचे मुख्यमंत्री यांना पूर्ण आत्मविश्वास आहे की, आपण उद्या जिंकणारचं. विरोधकांपैकी शिवसेनेला संविधानाचं काही देणंघेणं नाही. त्यांना नियम किंवा संसदीय परंपरा आपली घटना याचं काहीच देणंघेणं नाही. तोंडाला येईल ते मनात येईल ते बोलत जातात, त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या बोलण्याची दखल घेतली जाऊ नये, असं राणे यांनी एका वृ्त्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी