31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeटॉप न्यूजविधानसभेत कोरोनाचा शिरकाव, 32 जण पॉझिटिव्ह

विधानसभेत कोरोनाचा शिरकाव, 32 जण पॉझिटिव्ह

टीम लय भारी
मुंबई:महाराष्ट्र विधानसभेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे दोन दिवस उरले आहेत. विधिमंडळात प्रवेश करणाऱ्यांची आजपासून कोरोना चाचणी करणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे अधिवेशनाला गैरहजर आहेत. याबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्या अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.( Corona’s entry in the assembly, 32 positive)

 आदित्य ठाकरे म्हणाले की, “गर्दी वाढली आहे. ख्रिसमस न्यू-ईयर असताना लोक काळजी जास्त घेत नाहीत. प्रत्येकानं मास्क वापरणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेजबाबतचा निर्णय परिस्थितीनुसार घ्यावा लागेल. शाळांसंदर्भात पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ.”

पुण्यात कोरोनाचा कहर, 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

आज विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन वातावरण तापण्याची शक्यता

हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा सोमवारी महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे.स्वत:ला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याचा सल्लाही दिला होता.

तसेच विधिमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला. एक मंत्री आणि एका आमदारालाही कोरोना झाला आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळ आवारात प्रवेशापूर्वी आजपासून प्रत्येकाची कोरोना चाचणी करणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितलं.विधानसभा अधिवेशातील पोलीस, अधिवेशनातील कर्मचारी वर्ग यांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे. विधिमंडळ परिसरात दोनच दिवसांत 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह आमदार समीर मेघे यांचा समावेश आहे.

तर महाराष्ट्रातील मंदिरं पुन्हा बंद होऊ शकतात; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांकडून इशारा

Omicron Variant: Maharashtra reports nearly 1700 new Covid cases, 31 infected with Omicron

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी