30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजराष्ट्रपित्यांविरूद्ध चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रपित्यांविरूद्ध चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

टीम लय भारी  

छत्तीसगड : रविवारी संध्याकाळी रायपूरमध्ये दोन दिवसाच्या धर्मसंसदेच्या समारोपावेळी   कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींविरोधात अपमानास्पद शब्द वापरला आणि धर्माच्या रक्षणासाठी कट्टर हिंदू नेत्याला सरकारचे प्रमुख म्हणून निवडण्याचे आवाहन केले. त्यांनी महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून त्यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांचा जयजयकार केला. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि भाजपमधील २० हून अधिक नेते उपस्थित होते(FIR Filed against Kalicharan Maharaj).

कालीचरण यांच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते प्रमोद दुबे यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी छत्तीसगढ पोलिसठाण्यामध्ये हिंदू धर्मगुरू कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दलालांचा ठेकेदार भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडे बोट करू नये! : नाना पटोले

राहुल गांधी यांनी लडाख राज्य तत्वावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला

त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, राष्ट्रपितांविरोधात असे विधान मान्य नाही. आम्ही त्यांचा निषेध करतो. प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्याविरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यानी पीटीआयला दिली.

त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये “राजकारणातून राष्ट्र काबीज करणे हे इस्लामचे लक्ष्य आहे. आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी १९४७ मध्ये काबीज केले होते. त्यांनी यापूर्वी  ही इराण, इराक आणि अफगाणिस्तान ताब्यात घेतले होते. त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून बांगलादेश आणि पाकिस्तान काबीज केले. मी नथुराम गोडसेला सलाम करतो की त्याने गांधींची हत्या केली,” असे वक्तव्य केले.

देवेंद्र फडणवीसांना फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणी समन्स

Religious guru Kalicharan Maharaj sparks row says, ‘Godse ko namaskar for killing Gandhi’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी