34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजपोलिसानेच केला महिलेवर बलात्कार

पोलिसानेच केला महिलेवर बलात्कार

टीम लय भारी / वेब स्काय मीडिया

अंबरनाथ : पोलीस हे जनतेचे रखवालदार असतात. पण अंबरनाथ येथे एका पोलिसानेच महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे ( FIR registered against a police in rape case ).

विशेष म्हणजे, पिडीत महिला एका राजकीय पक्षाची पदाधिकारी आहे. या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून संबंधित पोलिसाने बलात्कार केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. अखेर, पीडित महिलेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागितली.

गृहमंत्र्यांनी पीडित महिलेचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता या पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद हिंदुराव असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  हिंदुराव हा अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत असून, त्याने एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिलेसोबत मैत्री करत प्रेमाचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंधही जुळले. एवढेच नव्हे तर हिंदुराव याने अंबरनाथच्या एका लहानशा मंदिरात त्या पीडित महिलेसोबत लग्नही केले आहे. त्या लग्नाला तिने विरोध करत विधिवत लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तात्पुरत्या स्वरूपात हे लग्न करू. नंतर सर्वांच्या उपस्थितीत लग्न करू, असे त्याने सांगितले.

हे सुद्धा वाचा

भाजपने आम्हाला शिकविण्यापेक्षा स्वतःच आत्मपरिक्षण करावे : शिवसेनेचा टोला

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा

पीडितेने लग्नाचा हट्ट करताच त्याने तिला जातीवरून हिणवत लग्नास नकार दिला. जातीवरून गैरशब्द वापरल्याने त्यांच्यात वादही झाला. त्याच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन त्यांना धमकाविले. या प्रकरणी पीडित महिला पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यावर तिची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. मात्र, गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अद्यापही मोकाटच

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याने पीडित महिलेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागितली. देशमुख यांनी पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शिवाजीनगर पोलिसांनी तक्रार दाखल करून हिंदुराव याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.  मात्र, त्याला अद्याप अटक झालेली नाही.

दरम्यान, संबंधित महिलेने पोलिसांसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचाही वापर करायला हवा होता, अशी प्रतिक्रियाही जनसामान्यांमधून उमटत आहे.

महिलेने केलेल्या तक्रारीत खरोखरच तथ्यता आहे का नाही, याचा तपास करूनच पोलिसांनी आरोपीवर कारवाई करायला हवी. पोलिसांनी राजकीय अथवा वरिष्ठांच्या दबावाला बळी न पडता नि:पक्ष तपास करावा. अन्याय झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहीजे. परंतु बऱ्याच महिला या कायद्याचा गैरवापर करतात. त्यामुळे या प्रकरणातही पोलिसांनी सर्व बाजू तपासूनच उचित कारवाई करावी अशी भावना जनमाणसांतून व्यक्त केली जात आहे.

Mahavikas AghadiRape case, Police rape to a woman

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी