31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजLay Bhari : ‘टाइम’च्या पहिल्या ‘किड ऑफ द इयर’ची भारतीय वंशाची संशोधक...

Lay Bhari : ‘टाइम’च्या पहिल्या ‘किड ऑफ द इयर’ची भारतीय वंशाची संशोधक मानकरी

टीम लय भारी

न्यूयॉर्क : भारतीय – अमेरिकी वंशाच्या गीतांजली राव या पंधरा वर्षांच्या संशोधक मुलीस ‘टाइम’चा पहिलाच ‘किड ऑफ दी इयर’ (Kid of the year) पुरस्कार जाहीर (Lay Bhari) करण्यात आला आहे. (Fifteen-year-old Indian-American researcher Gitanjali Rao has been named Time’s first ‘Kid of the Year’ award.)

तिने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत. (Gitanjali Rao has found solutions to the problem of contaminated drinking water and marijuana addiction as well as cyber bullying through technology.)

टाइम नियतकालिकाने म्हटले आहे की, हे जग ज्यांनी त्याला आकार दिला त्यांचे आहे. जग अनिश्चिततेकडे जात असताना नव्या पिढीतील मुले संशोधनातून जी उत्तरे शोधत आहेत ती महत्त्वाची आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे. टाइमने पाच हजार उमेदवारांतून राव हिची निवड केली असून तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली.

निरीक्षण, संशोधन, संदेशवहन, विचार-चर्चा यातून आपण काही समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असे गीतांजलीने आभासी मुलाखतीत सांगितले. दूषित पाण्यापासून अनेक समस्यांवर तिने अभिनव उत्तरे शोधली असून गप्पांमधूनही तिच्या बुद्धीची चमक प्रत्ययास आली.

प्रत्येक प्रश्नावर एकाच वेळी विचार करण्यापेक्षा एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करा, असा संदेश तिने तरुणांना दिला. ‘जर मी हे करू शकते तर तुम्हीही करू शकाल’, असा आशावाद तिने व्यक्त केला. कधी न पाहिलेल्या समस्या आमच्या नवीन पिढीपुढे आहेत असे सांगून ती म्हणाली की, काही जुन्या समस्याही अजून आहेत. कोरोनाची साथ ही एक महत्वाची समस्या आहे. मानवी हक्कांचे विषय आहेत. काही प्रश्न आपण तयार केलेले नाहीत, पण ते सोडवावे लागतील. त्यात सायबर गुन्हेगारी, हवामान बदल यांचा समावेश आहे. हे प्रश्न तंत्रज्ञानामुळे निर्माण झाले असे तिने स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी