28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeटॉप न्यूजFree hand from government : चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून 'फ्री-हँड'

Free hand from government : चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून ‘फ्री-हँड’

टीम लय भारी

नवी दिल्लीः लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसीवर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी मोदी सरकारनंही लष्कराला सर्वाधिकार (Free hand from government to respond to China) बहाल केले आहेत. वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) कोणत्याही चिनी आक्रमणाविरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्याचे आपत्कालीन अधिकार देण्यात आले आहेत. सोमवारी रात्री झालेल्या हिंसक संघर्षानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराला चीनविरोधातील कारवाईसाठी मोकळीक देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे याच भागात चीनच्या पीएलएनं युद्धसराव केला आहे. भारतीय लष्कर आणि चिनी सैन्य गेल्या महिन्याभरापासून लडाखच्या सीमेवर एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. चीन वारंवार भारताच्या भूमीत घुसखोरी करत असून, भारतीय जवानही त्याला वेळोवेळी रोखत असल्यानं चकमक उडत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चीनला जशास तसे उत्तर देण्यात आम्ही सक्षम असल्याचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितलं होतं.

आम्ही कधीच कोणाला उकसवलं नाही. तसेच आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. जेव्हा कधी वेळ आली तेव्हा आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपले जवान मारता मारता शहीद झाले आहेत याचा देशाला अभिमान आहे. आमच्या क्षमता वेळोवेळी आम्ही सिद्ध केलेल्या आहेत. आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणालाही छेडछाड करू देणार नाही, यासंदर्भात कोणालाही संभ्रम असण्याचं कारण नाही. भारताला शांती हवी आहे. पण जर भारताला संघर्षासाठी उकसवल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहे, असंही मोदींनी चीनला ठणकावलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी