30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजऔरंगाबादेत धक्कादायक प्रकार: घर बुक करताना जात विचारली, वकिलानं ठोकला अ‍ॅट्रॉसिटीचा दावा!

औरंगाबादेत धक्कादायक प्रकार: घर बुक करताना जात विचारली, वकिलानं ठोकला अ‍ॅट्रॉसिटीचा दावा!

 टीम लय भारी

औरंगाबादः स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु नवे घर बुक करण्यासाठी गेलेल्या एका वकिलाच्या कुटुंबाला बांधकाम साइटवरील कर्मचाऱ्याने आधी जात विचारली. जात कळाल्यानंतर घर दाखवण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप एका वकिलांनी केला आहे.( Going to book the house, the lawyer asked the claim of atrocity)

आमच्या जातीमुळे अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक दिली गेल्याचा आरोप सदर वकिलांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल केली. बांधकाम साइटवरील कर्मचाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन अश्लील वर्तन, टवाळखोराला स्थानिकांनी चोपला

अभिनेते हेमंत बिरजेंचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी

या प्रकरणी अ‍ॅड. महेंद्र गंडले यांनी तक्रार दाखल केली आहे. महेंद्र यांनी ही माहिती टीव्ही9 ला दिली. बोलताना सांगितले की, ते 7 जानेवारी रोजी पत्नी, मुलांसह भाईश्री गुपची भूमी विश्वबन येथील रो हाऊसची साइट बघण्यासाठी गेले. येथील रो हाऊस आवडल्यानंतर त्यांनी साइटवरील कर्मचाऱ्यांना त्याबद्दल चौकशी केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी गंडले यांना जात विचारली.

अ‍ॅड. गंडले यांनी अनुसूचित जातीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर तुमच्या मजातीच्या लोकांना घर देता येणार नाही, असे त्याने सांगितले. तसेच त्यानंतर त्यांनी बिल्डरचे कार्यलय गाठून घराची चौकशी केली, तिथेही मला जात विचारून घर नाकारण्यात आल्याचे अ‍ॅड. गंडले यांनी सांगितले.

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

Man held in Mumbai over sensational murder of criminal in Jodhpur

जातीवरून घर नाकारल्याचा आरोप!

या सगळ्या प्रकाराविरोधात अ‍ॅड. गंडले यांनी चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दिली. त्यावरून भाईश्री ग्रुपचे मकरंद देशपांडे, सोमाणी, जैन, बांधकाम साइटवरील कर्मचारी योगेश निमगुडे, सागर गायकवाड व इतरांविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी