31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजशिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध

शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध

टीम लय भारी

बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. अरबी समुद्राऐवजी स्मारक मुंबईतील राजभवनाच्या जागेवर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीवरून पुन्हा राजकारण होण्याची शक्यता आहे(Sambhaji Brigade opposes memorial of Shivaji Maharaj).

जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचे पूजन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी अशी माहिती दिली आहे.

गोष्ट ऐका शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीची !

‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या अडाणीवर गुन्हा दाखल करा’

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील अरबी समुद्रात भव्यदिव्य स्मारक होणार आहे. या स्मारकाचे काम सध्या सुरु आहे. मात्र त्याला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध केला आहे. शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्यापेक्षा राजभवनाच्या जागेवर उभारण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

स्मारक बनवण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून राज्यभरात मोहीम राबवली जाणार आहे. 19 फेब्रुवारीच्या आधी संभाजी ब्रिगेडचे कार्यक्रते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतची भूमिका मांडणार आहेत. राजभवनाची जागा उपलब्ध करून दिली तर संभाजी ब्रिगेड गावागावात जाऊन निधी उभारणीचे काम करणार आहे. तशी माहिती संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

बंगळुरुत छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना, कोल्हापूर, बेळगावमधील शिवप्रेमी संतापले!

Unauthorised tombs exist now at Kolaba Fort after ‘Raigad fort’; all forts must be free of Islamic encroachment – Hindu Janajagruti Samiti

दरवर्षी 12 जानेवारी रोजी उत्साहाने साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. 424 व्या जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सिंधखेडराजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून झाली. यावेळी आज सकाळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांनी माँसाहेब जिजाऊ यांचे पूजन केले.

मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसार यावर्षी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतो आहे. यावेळी शासकीय पूजाही संपन्न झाली आहे. पूजनवेळी अनेक जिजाऊ भक्त उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी