30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeसिनेमाअभिनेते हेमंत बिरजेंचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी

अभिनेते हेमंत बिरजेंचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी

टीम लय भारी

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अभिनेता हेमंत बिरजे जखमी झाले आहेत. हेमंत बिरजे यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगीही गाडीत होती. अपघातात त्यांनाही दुखापत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कारने दुभाजकाला दिलेल्या धडकेनंतर हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.( Mumbai-Pune expressway accident Actor Hemant Birje’)

१९८५ मध्ये आलेल्या ‘टार्जन’ चित्रपटामुळे हेमंत बिरजे प्रसिद्धीस आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “बॉलिवूड अभिनेता हेमंत बिरजे आपल्या पत्नी आणि मुलीसह प्रवास करत असताना हा अपघात झाला. तळेगाव टोलनाक्याजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारने दुभाजकाला धडक दिली. अपघातात पत्नी आणि मुलीलाही दुखापत झाली आहे”.

अक्षय कुमार शूट करणार Ram Setu चा अंडरवॉटर सीक्वेन्स, बोलावली इंटरनॅशनल टीम

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

हेमंत बिरजे आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं असून मुलगी सुरक्षित आहे. मुलीला कोणतीही दुखापत झालेली नाही. हेमंत बिरजे आणि त्यांच्या पत्नीला पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

‘टार्जन’ चित्रपटानंतर प्रसिद्धीस आलेले हेमंत बिरजे सध्या मात्र बॉलिवूडपासून दूर आहेत. ते यश ते पुढे टिकवू शकले नाहीत आणि बॉलिवूडपासून दूर होत गेले. हेमंत बिरजे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे. दिग्दर्शक बब्बर सुभाष आपल्या चित्रपटासाठी अभिनेत्याचा शोध घेत असताना त्यांची नजर हेमंत बिरजे यांच्यावर पडली होती. त्यानंतर हेमंत बिरजे यांना पहिला चित्रपट मिळाला.

कपिल शर्माने घेतली चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी

Lata Mangeshkar’s sister Usha Mangeshkar: “We can’t go to see Didi in the hospital as it is a COVID case” – Exclusive!

अभिनेत्री किमी काटकरसोबतच्या काही बोल्ड सीनमुळे चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. पण नंतर फ्लॉप चित्रपटांमुळे त्यांना काम मिळणं बंद होत गेलं आणि फक्त एका चित्रपटापुरते लक्षात राहिले. यामुळे त्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला. २०१६ मध्ये घरमालकाने त्यांना घराबाहेर काढल्याची माहितीही समोर आली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी