31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूज‘राज्यपालांनी संविधानाचा खेळखंडोबा केला, संविधानाच्या बारा वाजवल्या’

‘राज्यपालांनी संविधानाचा खेळखंडोबा केला, संविधानाच्या बारा वाजवल्या’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : संविधानातील तरतुदी धाब्यावर बसवून राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्याची संधी दिली. या राज्यपालांनी संविधानाचा खेळखंडोबा केला आहे. त्यांनी संविधानाच्या बारा वाजवल्या आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला हॉटेल गॅंट हयात या ठिकाणी सोमवारी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ‘आम्ही १६२’ या मोहिमेअंतर्गत संविधानाला साक्ष माणून प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या. आव्हाड म्हणाले की, भाजपने संविधान धाब्यावर बसविले आहे. तीन वर्षांपूर्वी आम्ही संविधानाच्या बचाव आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर हे आंदोलन देशभर पसरले. आताही महाराष्ट्रात सत्तासंघर्ष चालू आहे. भाजपने राज्यपाल या घटनात्मक पदाचा दुरूपयोग केला आहे. बहुमत नसताना चोर मार्गाने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे संविधान वाचाविण्याची गरज आहे. संविधान दिनाच्या आदल्या दिवशी आम्ही तिन्ही पक्षांचे सगळे आमदार एकत्र जमणार होतो. त्यामुळे संविधानाला साक्ष माणून ही शपथ घ्यावी असे मला सुचले. मी शरद पवारांशी बोललो. त्यांना ही संकल्पना आवडली. त्यानंतर उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या नेत्यांशी बोललो. सगळ्यांनी अनुमती दिली. संजय राऊत यांनी नियोजन केले, आणि ही शपथ दिली गेली.

शपथ कार्यक्रमाला नरहरी झिरवळ, पृथ्वीराज चव्हाण असे दोन – तीन आमदार नव्हते. अन्यथा सगळेजण उपस्थित होते. नरहरी झिरवळ विमानात होते. तर याच प्रकरणासाठी पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत होते. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु तरीही १६२ पेक्षा जास्त आमदार या ठिकाणी उपस्थित होते, असा दावा आव्हाड यांनी केला आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाला हेच अपेक्षित होते का ? : संजय राऊत

बहुमताची हत्या करावी. बहुमत नसलेल्यांना शपथ द्यायची, अन् संख्याबळ असलेल्यांना सत्तेबाहेर ठेवायचे हेच डॉ. बाबासाहेबांना हेच अपेक्षित होते का ? असा सवाल करीत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपने राष्ट्रपती – राज्यपाल कार्यालयाचा गैरवापर केला आहे. सत्तेचा आणि पैशाचा दुरूपयोग होत आहे. आमदार फोडायचा प्रयत्न होतोय. पण त्यांना आमदार फोडता आलेले नाहीक. एका भगतसिंगांनी देशासाठी बलिदान दिले. हे राज्यपाल भगतसिंग भाजपची सेवा करीत आहेत. खोटं बहुमत दाखविण्यात आले आहे. चोरट्यासारखे बहुमत दाखविले आहे. देशाच्या व महाराष्ट्राच्या जनतेला कळावे म्हणून काल १६२ आमदारांना आम्ही समोर आणले.

डॉ. संविधानात लिहिले आहे की, ज्याच्याकडे बहुमत आहे, त्यांनाच पंतप्रधान व मुख्यमंत्री बनवता येते. राज्यपाल घटनेचे पालक आहेत. परंतु या राज्यपालांनी साक्षीने संविधानाची हत्या केली. अजित पवारांनी दाखविलेल्या खोट्या कागदावर मंत्रीपदाच्या शपथ देण्यात आली. काल आमच्याकडे १६२ होते. बहुमताची चाचणी होईल तेव्हा हा आकडा १७० होईल. अशा प्रकारे सत्ता मिळविली तर देशात अराजक माजेल, असे बाळासाहेब म्हणाले होते. राज्यपाल व भाजपने लोकशाहीची तिरडी उचलली आहे. त्यांनी ताबडतो पायउतार व्हावे, किंवा बहुमताला ताबडतोब सामोरे जावे. आम्ही संयमाने घेतोय. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर असे कोणी घाला घालू शकत नाही. आम्ही चूप बसणार नाही

– खासदार संजय राऊत

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या पक्षनेत्यांचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेतील : विधीमंडळ सचिव

शरद पवारांनी भरला दम : शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला ‘धडा’ शिकवू

धनंजय मुंडे म्हणाले, माझे अजितदादांवर प्रेम, पण…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी