33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजअजित पवार की जयंत पाटील, विधानसभा अध्यक्षच फैसला करतील : विधीमंडळ सचिव

अजित पवार की जयंत पाटील, विधानसभा अध्यक्षच फैसला करतील : विधीमंडळ सचिव

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांची विधीमंडळ सचिवालयात नोंद झाली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु विधीमंडळाचे सचिव संजय भागवत यांनी ही चर्चा फेटाळली आहे.

संजय भागवत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधीमंडळ सचिवालयाकडे एक पत्र प्राप्त झाले आहे. यात जयंत पाटील हे पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्याचे नमूद केले आहे. हे पत्र विधानसभा अध्यक्ष यांच्या माहितीसाठी दिले गेले आहे. पक्षनेते कोण हे विधानमंडळ सचिवालय ठरवू शकत नाही. हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे भागवत म्हणाले.

दुसऱ्या बाजूला अजित पवार हेच राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते असल्याचा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा केला आहे. राजभवनमध्ये गटनेते म्हणून अजित पवार यांची नोंद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

भाजपच्या हाती हंगामी विधानसभाध्यक्ष, अजितदादांचे हत्यार

मोठी बातमी : उद्या बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, घोडेबाजार रोखण्यासाठी निकाल

‘राज्यपालांनी संविधानाचा खेळखंडोबा केला, संविधानाच्या बारा वाजवल्या’

शरद पवारांनी भरला दम : शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला ‘धडा’ शिकवू

धनंजय मुंडे म्हणाले, माझे अजितदादांवर प्रेम, पण…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी