31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजभारतीय संविधान घराघरात, मनामनात रुजवणार : वर्षा गायकवाड

भारतीय संविधान घराघरात, मनामनात रुजवणार : वर्षा गायकवाड

टीम लय भारी

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेच्या माध्यमातून अथक परिश्रम घेऊन लिहिलेली भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी “संविधान दिन” म्हणून देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो(Indian Constitution to be inculcated in every household: Varsha Gaikwad).

भारताची लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाने संविधान जागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.भारतीय राज्यघटनेचा जगभर आदर केला जातो. मुलांनी संविधानाचा अवलंब करावा यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संविधानाचा अभ्यास वाढवून मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे(The Department of Education has taken steps to ensure that children adopt the Indian Constitution).

अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळांमधील शिक्षकांना भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली असुन शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत घरोघरी भारतीय संविधान पोहोचवण्याच्या या उपक्रमाचे शिवसेना उपशाखाप्रमुख श्री. हितेंद्र राठोड यांनी स्वागत केले आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिल्यामुळे भारतीय संविधान लवकरच प्रत्येक घरा घरात व मनात पोहचून लोकशाहीला व राष्ट्राच्या एक्याला मजबूत करून आपली लोकशाही समाजात रूजण्यास व बळकट होण्यास मदत होईल असा आत्मविश्वास शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय, 1 मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा/कार्यशाळा सुरू होणार

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव नवीन ठाणे-दिवा मार्गावर एसी गाड्यांचा करणार शुभारंभ

Maharashtra govt to decide on easing Covid-19 curbs soon

शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी भारतीय संविधान प्रत्येकाच्या मनात रुजविणचा निर्धार केला या उपक्रमाअंतर्गत भारतीय संविधानाचे वितरण करण्यात आले.भारतीय राज्यघटनेचा जगभरात आदर, घटनात्मक मूल्ये शाळकरी मुलांनी आत्मसात करावी असे देखील त्याचे म्हणणे आहे

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुरस्कार विजेते क्रीडा शिक्षक श्री. विजय अवसरमोल, होमी भाभा विज्ञान पुस्तकाचे लेखक श्रीनिवासन मयाना सर उपस्थीत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी