35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजज्योती बसू प्रधानमंत्रीपद आणि बुद्धदेव भट्टाचार्य पद्म पुरस्कार का नाकारतात?

ज्योती बसू प्रधानमंत्रीपद आणि बुद्धदेव भट्टाचार्य पद्म पुरस्कार का नाकारतात?

टीम लय भारी
गावात प्रस्थापित  पुढाऱ्यामाग गोंडा घोळत शेपूट हलविणारा किंवा प्रस्थापित पक्षात असणारा तुमच्या ओळखीचा कॉम्रेड म्हणजे खरा कॉम्रेड नव्हे. खरा कॉम्रेड आयुष्य भर तत्वज्ञानाशी प्रामाणिक राहतो.(Jyoti Basu and Buddhadeb Bhattacharya reject the Padma award)

1996 साली त्यावेळच्या तिसऱ्या आघाडीने ज्योती बसू यांचे नाव प्रधानमंत्रीपदासाठी सुचविले. बसू यांचा नकार नव्हता आणि होकारही. त्यांनी होकार दिला असता तर वन ऑफ द बेस्ट पीएम आपल्याला मिळाला असता. बसू यांनी याबद्दलचा निर्णय पार्टीने घ्यावा म्हणून सांगितले. पक्षाच्या पॉलिट ब्युरोने असे तडजोडीचे प्रधानमंत्रीपद पार्टीच्या कार्ड होल्डरनी स्वीकारू नये असे सांगितले. बसु यांनी पक्षादेश पाळला. त्या निर्णयावर आजही टीका केली जाते. पक्षाचा आदेश आणि त्या पक्षाचे तत्वज्ञानच जर तसेच असेल तर त्यांचा निर्णय योग्यच होता.

हे सुद्धा वाचा

आनंद महिंद्रांनी एअर इंडियासाठी टाटा ग्रुपला दिल्या शुभेच्छा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या भावना

आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर’ चित्रपटातून येणार समोर

Buddhadeb No to Padma Bhushan: Why Communists Reject State Honours but Accept Other Awards

बसू यांचे वारसदार भट्टाचार्य यांनी काल पद्म पुरस्कार नाकारला. त्यालाही कारण आहे. पार्टीने मागेच ठरविलं आहे की कार्ड होल्डरनी सरकारचा कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही. भट्टाचार्य यांनी पार्टीच्या धोरणानुसार नकार दिला. बुद्धदेव यांना समजा काँग्रेसच्या सरकारने पुरस्कार दिला असता तरी त्यांनी नकारच दिला असता.

ईएम एस नम्बुद्रीपाद केरळचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री झाल्यावर एक कार्ड होल्डर त्यांना म्हणाला, आता आपलेच राज्य आहे. त्यावर ई एम एस म्हणाले, ‘आपण सत्तेत आहोत. पण सत्ता किंवा सरकार आपल्या विचारांचे नाही.’

कॉम्रेड बसू आणि कॉम्रेड भट्टाचार्य पुन्हा पुन्हा होत नाहीत. नावापुढं कॉम्रेड लावणारे माणिक जाधव गावगन्ना भेटतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी