31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजलता मंगेशकर निधनामुळे दुखवटा, काय आहे सार्वजनिक सुट्टी देण्याचं कारण ?

लता मंगेशकर निधनामुळे दुखवटा, काय आहे सार्वजनिक सुट्टी देण्याचं कारण ?

टीम लय भारी 

मुंबई : रविवारी ६ फेब्रुवारी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. शिवाजी पार्क वर संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. आणि याच निमित्तानं दुखवटा म्हणून राज्य सरकारनं आज राज्यात सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली. यावर केंद्र सरकारने देखील राजकीय दुखवटा जाहीर केला असून पुढील दोन कोणतेच राजकीय व सरकारी कार्यक्रम होणार नाही असे जाहीर केले गेले आहे(Lata Mangeshkar’s demise, what is reason for giving public holiday).

सर्वांना आठवत असेल तर माननीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर देखील सरकारने सुट्टी जाहीर केली होती. तसेच आता मात्र लता मंगेशकरांच्या निधनांनंतर काढण्यात आलेल्या सूचनेत म्हटले आहे की, आज रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महापालिकेनं देखील ट्विटर च्या अधिकृत अकाउंट वरून भारतरत्न लता मंगेशकर ह्यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर केली. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये उद्या बंद राहतील, असे पोस्ट केले आहे. उच्च न्यायालयाने देखील या अधिकृत सूचनेनुसार सुट्टी जाहीर केली आहे.

हे सुद्धा वाचा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

लतादीदींना श्रद्धांजली वाहताना संसदही झाले भावुक

Lata Mangeshkar demise: This is how some states will honour the legendary singer

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी