35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यBreaking : मंत्रालय प्रवेश सामान्य लोकांसाठी बंद, बाहेरच्या सरकारी अधिकाऱ्यांवरही निर्बंध, बैठकाही...

Breaking : मंत्रालय प्रवेश सामान्य लोकांसाठी बंद, बाहेरच्या सरकारी अधिकाऱ्यांवरही निर्बंध, बैठकाही रद्द

टीम लय भारी

मुंबई : ‘करोना’चा ( Coronavirus) फैलाव टाळण्यासाठी मंत्रालयात सामान्य लोकांसाठीचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. बाहेरून येणारे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही निर्बंध घालण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर सरकारी बैठकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. गृह विभागाने याबाबतचा आदेश आज जारी केला आहे.

Breaking : मंत्रालय प्रवेश सामान्य लोकांसाठी बंद, बाहेरच्या सरकारी अधिकाऱ्यांवरही निर्बंध, बैठकाही रद्द Breaking : मंत्रालय प्रवेश सामान्य लोकांसाठी बंद, बाहेरच्या सरकारी अधिकाऱ्यांवरही निर्बंध, बैठकाही रद्द

सामान्य लोकांना मंत्रालयात प्रवेश देणारी यंत्रणाच बंद करण्यात आली आहे. मंत्री किंवा राज्यमंत्री यांनी पत्र दिले तर त्यांच्याकडे प्रतीदिन जास्तीत जास्त १० लोकांना प्रवेश दिला जाईल, तर मुख्य सचिव किंवा सचिवांकडे पाच लोकांना प्रवेश दिला जाईल. परंतु या प्रवेशार्थींची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडले जाईल.

मुंबईबाहेरील सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही मंत्रालय प्रवेश बंद असेल. गृह विभागाने ज्यांना एक वर्षाचे तात्पुरते प्रवेशपत्र दिले आहेत, त्यांचे कार्यालय मुंबईत असेल तरच त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळेल.

मंत्री, राज्यमंत्री व सचिव यांनी तातडीची गरज असेल तरच बैठका घ्याव्यात. बैठकीसाठी बाहेरील अधिकारी, कर्मचारी व खासगी व्यक्ती यांना मंत्रालयात बोलवू नये असे या आदेशात नमूद केले आहे.

हजेरीसाठी मंत्रालयात कार्यरत असलेली बायोमेट्रिक प्रणालीसुद्धा बंद करावी. त्या ऐवजी त्या त्या खात्याने मस्टरवर हजेरीची नोंद ठेवावी असे या आदेशात म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी