29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमंत्रालयशरद पवारांसमोर धनंजय मुंडेंचे ‘आयएएस’स्टाईल प्रेझेंटेशन; उद्धव ठाकरे म्हणाले, तगडा मंत्री !

शरद पवारांसमोर धनंजय मुंडेंचे ‘आयएएस’स्टाईल प्रेझेंटेशन; उद्धव ठाकरे म्हणाले, तगडा मंत्री !

टीम लय भारी

मुंबई : मागासवर्गीयांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारच्या सुमारे सात खात्यांमधील प्रधान सचिवांनी सादरीकरण केले. पण सामाजिक न्याय विभागाचे सादरीकरण सचिवांऐवजी या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनीच केले. मुंडे यांच्या या सादरीकरणावर पवारांसह बैठकीतील सगळेच मान्यवर प्रभावित झाले.

मुंडे यांचे प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथे उपस्थित असलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींगडे पाहात ‘एवढा तगडा मंत्री तुम्हाला दिला आहे, कशाला काळजी करता ?’ अशी प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांसमोर धनंजय मुंडेंचे ‘आयएएस’स्टाईल प्रेझेंटेशन; उद्धव ठाकरे म्हणाले, तगडा मंत्री !

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीयांसाठी गेल्या तीन वर्षांत भाजपच्या काळात अल्प निधीची तरतूद केली होती. ‘महाविकास आघाडी’ सरकारने अर्थसंकल्पात तरतूद वाढविली आहे. पुढील काळात ती आणखी वाढविण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी निधी वाढवला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी खात्याच्या वतीने पाऊले उचलली जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृती अशा योजनांसाठी निधीची घसघशीत तरतूद केली आहे. शिवाय या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीही नियोजन केल्याचे मुंडे यांनी प्रेझेंटेशनमधून दाखवून दिले. मुद्देनिहाय मांडणी, पुरेशी आकडेवारी, कळीच्या मुद्द्यांवर विशेष जोर देत मुंडे यांनी हे प्रेझेंटेशन केले. अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक तरतूदींवर त्यांनी माहिती दिली. योजनानिहाय सुरू असलेली प्रगती, विभागातील प्रदीर्घ काळातील समस्या आणि त्यावरील उपाययोजना यांवर सविस्तर व अभ्यासपूर्ण मुद्दे त्यांनी मांडले.

एखाद्या अभ्यासू अधिकाऱ्याप्रमाणे त्यांनी हे सादरीकरण केले. विशेष म्हणजे, सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून मुंडे यांनी अवघ्या चार महिन्यांपूर्वीच सूत्रे हाती घेतली आहेत. पण त्यांनी खात्याचा खडान् खडा अभ्यास केला असल्याचे या सादरीकरणातून दिसून आले.

सामान्यत: मंत्री, राजकीय नेते हे कोणत्याही विषयाची मांडणी राजकीय स्टाईलमध्ये करीत असतात. पण मुंडे यांनी केलेली मांडणी अधिकाऱ्यांच्या शैलीतील होती असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

यावेळी शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, अर्थ व नियोजन अशा विविध खात्यांच्या सचिवांनीही सादरीकरण केले. सामाजिक न्याय खात्याचे सचिव पराग जैन हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःहूनच आपल्या खात्याचे प्रेझेंटेशन सादर केले. मुंडे यांच्या या प्रेझेंटेशननंतर जैन यांना सांगण्यासारखे काही शिल्लकच राहिले नाही.

मुंडे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक महिन्याच्या कामाचा अहवाल तयार करायला सुरूवात केली आहे. जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे अहवाल त्यांनी शरद पवार व पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्यांकडे सादर केले होते. मुंडे यांच्या या उपक्रमाचे शरद पवार यांनीही कौतुक केले होते. त्यानंतर आता त्यांनी ‘आयएएस’स्टाईल प्रेझेंटेशन करून आपल्या प्रभावी कामाची चुणूक दाखवून दिली आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचे ‘या कारणा’साठी केले कौतुक

शरद पवार म्हणाले, चैत्यभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा उत्तम संगम होईल; दोन वर्षांत स्मारक उभे राहील

Super EXCLUSIVE : धनंजय मुंडेंनी पंतप्रधान कार्यालयाचा अनागोंदी कारभार आणला चव्हाट्यावर

धनंजय मुंडेंचा वंचितांसाठी मोठा निर्णय, मुंबईत १६ हजार घरे देणार

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना ‘या’ कारणास्तव दिले सामाजिक न्याय खाते

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना बजावले, योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी