35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजकोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबद्दल केंद्राच्या राज्यांना सूचना

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबद्दल केंद्राच्या राज्यांना सूचना

टीम लय भारी

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने (Central Government) राज्यांना पत्र लिहून सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही प्रमुख लक्षणं आढळल्यास नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याच्या सूचनाही पत्रात दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि ICMR प्रमुख बलराम भार्गव यांनी राज्यांना पत्र पाठवली आहेत(Notice to the states from centre, increasing number of corona patients).

RTPCR चाचणीचा अहवाल मिळण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे राज्य सरकारने रॅपिड अँटीजन टेस्टचा जास्तीत जास्त वापर करावा. त्याचबरोबर चाचण्यांचा वेग वाढवणंही गरजेचं आहे, असंही या पत्रामध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रात कोणत्या लक्षणं अधिक गंभीर आहेत, हे देखील सांगितलं आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, जर कुणालाही खोकला, डोकेदुखी, घशात खवखव, श्वास लागणे, अंगदुखी, चव अथवा वास घेण्यात समस्या, थकवा आणि जुलाब अशी लक्षण असतील, तर त्याला गांभीर्याने घेऊन त्याची चाचणी करणं आवश्यक आहे, असंही पत्रात सांगितलं आहे.

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ३ तसांचा पेपर आता झाला ३:३० तासांचा

15-18 वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीसाठी नोंदणी सुरू : मनसुख मांडविया

दरम्यान, देशात सध्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरीयंटने प्रवेश केला आहे. त्यातच कोरोना रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत विचार करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडू शकते.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत रद्द

The situation of Corona in these 8 states is appalling, the Center has given special instructions by writing a letter

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी