29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeशिक्षणविद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ३ तसांचा पेपर आता झाला ३:३० तासांचा

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ३ तसांचा पेपर आता झाला ३:३० तासांचा

टीम लय भारी

पुणे : देशामध्ये किमान २ वर्षांसाठी कोरोनामुळे लॉकडाऊन लावला गेला होता. या लोकडाऊन मुळे २ वर्षांसाठी जणू सर्व कारभार बंदच होता. बाकी क्षेत्रांप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही याचा मोठा परिणाम झाला. विद्यार्थी देखील अभ्यासापासून दुरावले गेले. परिक्षा ऑनलाईन झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पेपर लिहीण्याचा सरावही कमी झाला असणार(Good news for students! The 3 hour paper is now 3:30 hours).

अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने दहावी बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयारी, वेळ, सराव या सर्व प्रश्नांना समोरे जायला लागू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

15-18 वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीसाठी नोंदणी सुरू : मनसुख मांडविया

WHO प्रमुखांनी नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने केली

याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा आहे. परीक्षेत पेपर सोडविण्यासाठी त्यांना ३० मिनिटे म्हणजेच अर्ध्या तासाचा वेळ अधिक दिला जाणार आहे. म्हणजेच यावर्षीचा तीन तासाचा पेपर साडेतीन तासाचा असणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार ८० गुणांच्या पेपरला ३० मिनिटे आणि ४० गुणांच्या पेपरला १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे.

मुंबईत कलम १४४, १५ जानेवारीपर्यंत वाढवले

SSC, HSC: State board issues notification to waive off late fees for exam registration

हे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आले असून विद्यार्थी, शाळा आणि पालकांनी हेच वेळापत्रक प्रमाण मानावे व दुसऱ्या कोणत्याही वेळापत्रक आणि माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. तसेच परीक्षेपूर्वी शाळांकडे छापील वेळापत्रक देण्यात येणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेस बसावे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी