31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजरवी कुमार दहियाची लढत आता सुवर्ण पदकासाठी

रवी कुमार दहियाची लढत आता सुवर्ण पदकासाठी

 

टीम लय भारी
मुंबई : भारताच्या रवी कुमार दहियाने, पुरुष 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याच्या या दमदार खेळामुळे भारताला आता चौथे पदक निश्चित झाले आहे. (Ravi kumar dahiya hot selected in final round under 57 kg)

काझाकिस्तानच्या नुरीस्लॅम सानायेव्ह याला भुईसपाट करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. संपुर्ण भारतीयांची आता त्याच्या कडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

ऑलिम्पिकचे खेळाडू मोदींचे अतिथी

Ravi
रवी कुमार दहिया

रवी कुमार दहियाची लढत आता सुवर्ण पदकासाठी रवी कुमार दहियाची लढत आता सुवर्ण पदकासाठी

अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, मेल आणि युट्युब होणार बंद

57 किलो पुरुषांचा गटाचा उपांत्य सामना हा भारताचा रवी कुमार दहिया आणि काझाकिस्तानच्या नुरीस्लॅम सानायेव्ह यांच्यात खेळण्यात आला. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात रवी कुमारनं उत्तम बचावात्मक खेळ खेळून 2-1 अशी चांगली आघाडी केली. दुसऱ्या सत्रात प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडूने 9-3 अशी आघाडी घेतली.

पुढच्या फेरीत जोरदार कमबॅक घेऊन रवीने काझाकिस्तानच्या खेळाडूला रिंग बाहेर फेकून 9-5 असे 3 गुण घेतले. प्रतिस्पर्धी खेळाडू हा जखमी झालेला पाहायला मिळाला, परंतु त्याने प्रथमोपचार घेऊन परत मॅटवर प्रवेश केला. पण रवी कुमारने प्रतिस्पर्धीला पुन्हा एकदा दणका दाखवून मॅटवर लोळविले.

रवी कुमार दाहियाच्या या उत्तम कामगिरी नंतर सर्वच भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. हरियाणातील सोनीपत येथून 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या नाहरी या गावातून हा खेळाडू जन्माला आला. या गावचे वैशिष्ट म्हणजे; या आधी या गावाने आणखी 2 ऑलिम्पिक खेळाडू- महावीर सिंग ( 1980 मॉस्को, 1984;लॉस एंजेलिस) आणि अमित दहिया( 2012 लंडन) भारताला दिले आहेत. तर, रवी कुमार दहिया हा तिसरा ऑलिंपिक खेळाडू आहे. त्यांच्या या पदकानंतर त्यांचे वडील राकेश यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान उघड्यावर, निवासस्थान दिले भाड्याने

Tokyo Olympics 2020 Live Updates: India lose 1-2 against Argentina in women’s hockey semis, to play for bronze now

रवी कुमारच्या पदकानंतर गावाला नियमित वीज आणि पाणी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आधी फक्त मर्यादित कालावधी साठी विजेचा पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या पदकामुळे भारताच्या ऑलिम्पिक पदकात भर तर पडणारच आहे, परंतु त्या गावचे रूप देखील पालटणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी