30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeसिनेमा1984 मधील महत्वाच्या मिशनवर आधारित 'बेल बॉटम' चा ट्रेलर प्रदर्शित

1984 मधील महत्वाच्या मिशनवर आधारित ‘बेल बॉटम’ चा ट्रेलर प्रदर्शित

टीम लय भरी

मुंबई : बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचा बहुचर्चित, रणजित तिवारी दिग्दर्शित बेल  बॉटम चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी संध्याकाळी प्रदर्शित करण्यात आला. येत्या 19 ऑगस्टला हा चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. एकूण 3 मिनिट 29 सेकंदाचा हा अतिशय थरारक ट्रेलर आहे. यावरून हा चित्रपट अतिशय रोमहर्षक असणार असे प्रकर्षाने वाटत आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच दोन तासांच्या आत त्याला तब्बल 4 लाख 50 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले (Trailer of Akshay Kumar Bell Bottom released).

हा चित्रपट 1984 सालच्या विमान अपहरण या सत्य घटनेवर आधारित आहे. हायजॅक केलेले विमान व त्यातील प्रवाश्यांना सुखरूप वाचवण्याचे आव्हान भारत सरकारपुढे आहे. या आव्हानात्मक कामासाठी भारत सरकारला एका कर्तव्यदक्ष आणि चाणाक्ष माणसाच्या शोधात आहे. याची जबाबदारी बेल बॉटम् नावाचा कोड असलेल्या रॉ अधिकाऱ्यावर सोपवली आहे.

बेल बॉटोम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अक्षय कुमारने दिली माहिती

उपमुख्यमंत्र्यांसोबत केले पुणे मेट्रोचे उद्धघाटन, त्याच मेट्रो एमडीवर राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप

या गुप्तहेराची ही प्रमुख भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे. यामध्ये अक्षय कुमारचे वर्णन करताना अत्यंत हुशार, त्याची बुद्धी अतिशय तीक्ष्ण आहे. तो राष्ट्रीय स्थरावरचा बुद्धिबळ खेळाडू असून तो गाणे देखील शिकवतो. त्याला हिंदी, इंग्रजी सोबतच जर्मन आणि फ्रेंच अशा भाषा बोलता आणि लिहिता देखील येतात. त्याचे लग्न झालेले आहे; तर त्याच्या पत्नीची भूमिका ही वाणी कपूर या प्रसिध्द अभिनेत्रीने साकारली आहे. तर, इंदिरा गांधी यांची भूमिका लारा दत्ता हिने साकारली आहे. लारा दत्ता हिच्या ह्या भूमिकेची चर्चा सामाजिक माध्यमावर होत आहे. तिने साकारलेल्या ह्या भूमिकेबद्दल  तिचे कौतुक होत आहे. या कलाकारांसोबत हुमा कुरेशी, अनिरुद्ध दवे, आदील हुसेन, अश्या दिग्गजांनी भूमिका साकारल्या आहेत.

Trailer of Akshay Kumar Bell Bottom released
लारा दत्ता

या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित तिवारी यांनी केले आहे. तर, निर्मिती ही वासू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी, निखिल अडवाणी यांनी केली आहे. तर, या चित्रपटाची शूटिंग ही दुबई, स्कॅप्टलंडन मध्ये झाली आहे (The film was shot in Dubai, Scotland).

अखेर MPSC ची परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; लोकसेवा आयोगाची घोषणा

‘Bell Bottom’ trailer: Akshay Kumar’s espionage spy thriller drama promises to be one action-packed and thrilling ride

जुलै मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट, कोविडमुळे चित्रपट गृह बंद असल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता हा चित्रपट ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित केला जाणार आहे (The film will now be screened on OTT media).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी