29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजअँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, मेल आणि युट्युब होणार बंद

अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, मेल आणि युट्युब होणार बंद

टीम लय भारी
दिल्ली : स्मार्टफोन चा वापर करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या महिन्यापासून फोन मधील Gmail आणि youtube ऍप बंद होणार आहेत. अशी माहिती गुगल ने दिली. (Google planning to stop supporting google apps on some Android phone)

Google
गुगल ऍप्स 

ज्या फोन चे अँड्रॉइड वर्जन 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमी आहे त्या फोन मध्ये गूगल कम्पनीने गूगल ची काही ऍप्स, Gmail आणि youtube बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच संदर्भात वापरकर्त्यांना मेल करून गूगल ने याविषयी माहिती दिली आहे.

ऑलिम्पिकचे खेळाडू मोदींचे अतिथी

नारायण राणे सरसावले, अगरबत्तीवाल्यांसाठी !

या मेल वरून असे समजते की येणाऱ्या 27 सप्टेंबर पासून गुगल वर्जन 3 पेक्षा कमी असलेल्यांना सपोर्ट करणार नाही. हा निर्णय गूगल ने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला आहे.

सप्टेंबर नंतरही जर gmail आणि youtube वापरायचे असल्यास कमीत कमी 3.0 म्हणजेच हनिकोंब मध्ये अपडेट करावे लागेल. यामुळे फोन मध्ये ऍप लेव्हल साइन इन वर परिणाम होऊ शकतो. मात्र फोन च्या ब्राऊजर मधून वापरकर्त्यांना साइन इन करावे लागेल. Gmail, google search, google drive ani YouTube मध्ये साइन इन करावे लागेल.

‘मुंबईचे लोकलप्रवाशी शिवपंख लावणार, अन् कामावर उडत उडत जाणार’, मनसेने सांगितले भाकीत

Google makes Chrome for Android a 2FA security key for account sign-in

या निर्णयामुळे फार लोकांना फटका बसणार नाही असेही गूगल ने कळवले आहे. याप्रकारे जुने अँड्रॉइड वर्जन वापरकर्त्यांची संख्या फार कमी आहे. 27 सप्टेंबर नंतर जुनी वर्जन वापरणाऱ्या स्मार्टफोन वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर युजरनेम आणि पासवर्ड एरर दिसेल. त्यानंतर मोबाईल बंद करून पुन्हा सुरू केल्यानेही काही उपयोग होणार नाही. नवा पासवर्ड आणि युजरनेम बनवला तरीही फोन काम करणार नाही असे या मेल मधून गूगल टेक ने कळवले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी