31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजगोल्ड हुकले, सिल्वर वर मानावे लागले समाधान

गोल्ड हुकले, सिल्वर वर मानावे लागले समाधान

 

टीम लय भारी
टोकियो: भारताचा कुस्तीपटू रविकुमार दहीया याने आज ऑलिम्पिक अंतिम सामन्यात लढत दिली. रशिया विरूद्ध भारत या सामन्यात आज रविकुमारच्या हातून सुवर्ण पदक निसटले ( Ravi Kumar won silver medal ).

रविकुमार दहियाला सुवर्ण पदक विजेत्या झाऊर गुडएव याच्या कडून पराभव स्वीकारून रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. रवी कुमारला 7-4 अशा गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला.

ठाकरे सरकारकडून बदल्यांचा बाजार, कायदा बसविला धाब्यावर; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

Ravi Kumar
रवी कुमार यांना मिळाले रजत पदक

‘ओठांवर वेदना होतात म्हणून ‘देवेंद्रां’चे नाव हातावर गोंदले’ – नरेंद्र पाटील

पहिल्या फेरीनंतर रवी कुमार 4-2 (Ravi Kumar scored 4-2) असा पिछाडीवर होता. झाऊरने प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवले. त्यानंतर रवीने दोन गुण मिळवून बरोबरी केली.

 

पुन्हा झाऊरने दोन गुणांची कमाई केली. रविकुमारला पिछाडीवर टाकून 3 गुण मिळवत 7-2 अशी आघाडी केली. अखेर प्रतिस्पर्धीने 7-4 असा खेळ खेळून रवी कुमारचा पराभव केला. कालच्या काझाकिस्तानच्या सानायेव्ह या खेळाडू सोबत उपांत्य फेरीत खेळताना, प्रतिस्पर्धीने रवी कुमारच्या हाताला चावा घेतला होता. त्याच्या हाताला त्या मुळे काल जखम झाली होती. त्याच जखमी हाताने रविकुमारने आज अंतिम खेळासाठी लढत दिली.

चक दे इंडिया! 41 वर्षांनंतर पुरुष हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय

Maha flood fury: Over 100 killed, thousands evacuated; CM visits affected areas

2012 नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे कुस्ती प्रकारातील पाहिले पदक आहे. तसेच, टोकियो ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे रौप्य पदक आहे. ऑलिम्पिक कुस्तीच्या अंतिम फेरीत जाणारा रवीकुमार हा दुसरा भारतीय आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी