28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeव्हिडीओशरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत माढा मध्ये रंगणार...

शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत माढा मध्ये रंगणार…

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत(Devendra Fadnavis vs Sharad Pawar). सोपी वाटणारी निवडणूक अवघड झाली, या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे भाजपासाठी ही निवडणूक अवघड असल्याचे चित्र आता दिसत आहे. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर जिल्यात लागोपाठ दोन सभा घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपमधील या चुरशीच्या निवडणुकीत माढ्याची जागा कायम राखण्याचं मोठं आव्हान आता भाजपासमोर असणार आहे. नमस्कार मी सुजाता शिरसाठ-शेकडे, आपण पाहत आहात लय भारी…माढा मतदार संघ म्हणजे आता प्रतिष्ठेची लढत झालेली आहे, खासकरून शरद पवार आणि देवेंद्र फड़णवीस यांसाठी. याच मतदार संघात एका दिवसात ३-३ सभा घेताना दिसताहेत पवार, फडणवीस, अगदी नरेंद्र मोदीही. माढा लोकसभेत २००९ साली शरद पवार निवडून आले होते. २०१४ मध्ये भाजपने सदाभाऊ खोतांना पुढे केले खरे पण शेतकरी संघटनेची उमेद्वारी मिळालेल्या विजयसिंह पाटलांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. त्यामुळे भाजप अगदी सुरूवातीपासूनच या मतदार संघासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. आणि आता तर या फोडाफोडीच्या राजकारणानंतर ही लढत मोहिते-पाटील, नाईक-निंबाळकरांसोबतच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांसाठी नक्कीच प्रतिष्ठेची झाल्याचं दिसून येत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी