31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजशाळा, महाविद्यालयांबाबत लवकरच निर्णय; आदित्य ठाकरे यांचे सूतोवाच

शाळा, महाविद्यालयांबाबत लवकरच निर्णय; आदित्य ठाकरे यांचे सूतोवाच

टीम लय भारी

मुंबई :  करोनाच्या संसर्गाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळा, महाविद्यालयांबाबत परिस्थती पाहून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सूतोवाच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना केले.(schools and colleges soon Decisions ; Aditya Thackeray)

‘सध्यस्थिती गंभीर नसली तरी करोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी. गर्दी टाळणे आणि मुखपट्टीचा वापर प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. सध्या नाताळ सणानिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्टय़ा आहेत. मात्र पुढील आठवडय़ात शाळा, महाविद्यालये सुरू ठेवायच्या की नाही याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल,’

 पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी; बंगळूरूमधून एकाला अटक

राज्यातील शाळांबाबत ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘काही मुलांनी दोन वर्षे शाळा  पाहिलेलीच नाही. याबद्दल निश्चितच दु:ख आहे, पण आरोग्य ही आपली प्राथमिक गरज असल्याने काही निर्णय घ्यावे लागतात,’असेही ते म्हणाले.

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक पदवीदान (दीक्षांत) समारंभ सोमवारी  फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात पार पडला. समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्या ठाकरे समारंभास उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंनी केले EV पार्किंग चे उदघाटन

Uddhav government to defy Governor order, hold Maharashtra Speaker poll

दीक्षांत सभागृह इतर महाविद्यालयांनाही खुले

मुंबई विद्यापीठाशी  संलग्नित महाविद्यालयांना त्यांच्या पदवीदान समारंभासाठी विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह खुले करण्यात येईल, अशी घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी यावेळी केली. या निमित्ताने सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसर अनुभवता येईल. याचे तपशील कुलसचिव महाविद्यालयांना देतील, असेही ते म्हणाले. संलग्नित महाविद्यालयांतून लाखो विद्यार्थी दरवर्षी उत्तीर्ण होत असले तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अव्वल गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात पदवी स्वीकारण्याचा मान मिळतो. उर्वरित प्रमाणपत्रे महाविद्यालयांमध्ये छोटेखानी समारंभ आयोजित करून किंवा वैयक्तिक पातळीवर दिली जातात. त्यामुळे हे सभागृह महाविद्यालयांना पदवीदान सोहळय़ासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अधिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी विद्यापीठाला केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी