33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी; बंगळूरूमधून एकाला अटक

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी; बंगळूरूमधून एकाला अटक

टीम लय भारी

मुंबई : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरूमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने ही धमकी पाठवली होती. व्हॉट्सअ‍ॅपवर लिहिलेल्या संदेशामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचे म्हटले होते(Aditya Thackeray, threat to him, one arrested).

आठ डिसेंबरला आला पहिला धमकीचा संदेश

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने सर्वप्रमथ आठ डिसेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पहिला मॅसेज पाठवला होता. या मॅसेजवर ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप आरोपीने आपल्या मॅसेजमध्ये केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी या मॅसेजला रिप्लाय दिला नाही. त्यानंतर आरोपीने त्यांना दूरध्वनीवरून तिनदा कॉल केले. आदित्य यांनी ते कॉल स्वीकारले नाही. कॉल स्वीकारले नसल्याने संतापलेल्या आरोपीने त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

ओमायक्रॉन: आदित्य ठाकरेंचं केंद्राला पत्र, लसीकरणाबद्दल मागण्या करताना म्हणाले….

जॅकलिन आणि नोरा फतेहीला आणखी एक धक्का, ईडीकडून मोठी कारवाई

आरोपीला अटक 

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या मागावर होते. अखेऱ बंगळूरुमधून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सायबर पोलिसांनी तात्रिक पद्धतीने तपास करत आरोपीला बड्या ठोकल्या.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी सरकारची घोषणा होती, त्याचे काय झाले? शिवसेनेचा सवाल

SSR fan threatens to kill Aditya Thackeray, arrested

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी