32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeटॉप न्यूजशिवसेनेचा दसरा मेळावा होणार अवघ्या ५० जणांच्या उपस्थितीत

शिवसेनेचा दसरा मेळावा होणार अवघ्या ५० जणांच्या उपस्थितीत

टीम लय भारी

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या भव्य दसरा मेळाव्याला तब्बल ५३ वर्षांची परंपरा आहे. परंतु यंदा ‘कोरोना’मुळे अवघ्या ५० जणांच्याच उपस्थितीत हा मेळावा आयोजित केला जाणार आहे ( Shivsena Dussehra Melava will be organize with 50 persons ).

दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे होणारे झंझावती भाषण त्यांच्या वार्धक्यामुळे सन २०१२ पासून थांबले. नंतर त्यांचे निधन झाले. बाळासाहेबांची ही परंपरा उद्धव ठाकरे यांनी पुढे चालू ठेवली.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या मेळाव्यासाठी जमा होत असतात. अवाढव्य शिवाजी पार्क त्यावेळी ओसंडून वाहत असते. लाखभर लोकांच्या उपस्थितीत होणार हा मेळावा संपूर्ण महाराष्ट्राचे व देशातील राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेत असतो.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनाही भाजपला भगदाड पाडणार

रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपातील काढली हवा

BJP : निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा भाजपमध्ये सूर

Sena’s Dasara rally loses its lustre

यंदा मात्र ‘कोरोना’मुळे शिवाजी पार्कवर होणारा मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी सावरकर स्मारकामध्ये मोजक्याच ५० जणांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी निवडक पदाधिकारी व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे यावेळी प्रमुख भाषण होईल. हे भाषण सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांद्वारे थेट प्रक्षेपित केले जाणार आहे.

उद्धव ठाकरे सायंकाळी ६.३० वाजता सह परिवार कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील. त्यानंतर ते ७ वाजता सावरकर स्मारकामध्ये येवून भाषणाला सुरूवात करतील. यावेळी मंत्री, आमदार, खासदार व प्रमुख नेते अशी मोजकीच मंडळी उपस्थित असतील अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे ( Uddhav Thackeray will be deliver speech ).

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी