36 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीनंतर आता शिवसेनाही भाजपला भगदाड पाडणार

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनाही भाजपला भगदाड पाडणार

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे मातब्बर नेते एकनाथ खडसे यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता भाजप समर्थक एक आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहे ( MLA Geeta Jain will be join Shivsena ).

मीरा – भाईंदरच्या आमदार गीता जैन आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत ( MLA Geeta Jain will meet Uddhav Thackeray at Matoshri ).

गीता जैन विद्यमान आमदार आहेत. त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. परंतु मीरा भाईंदर महापालिकेत यापूर्वी त्या भाजपच्या महापौर होत्या ( MLA Geeta Jain is former Mayor of Mira Bhayandar Municipal corporation).

हे सुद्धा वाचा

रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपातील काढली हवा

NCP : नाथाभाऊ काय चीज आहे ते आता दाखवून देऊ : शरद पवार

खरे व्हिलन कोण ? खडसे की, फडणवीस ??

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती. नरेंद्र मेहता त्यावेळी आमदार होते. भाजपने मेहता यांनाच पुन्हा उमेदवारी दिली ( MLA Geeta Jain was defeat to Narendra Mehata ).

नाराज झालेल्या गीता जैन यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीत जैन यांनी नरेंद्र मेहता यांचा १५ हजार मतांनी पराभव केला.

निवडणुकीनंतर भाजपसाठी आमदारांचे संख्याबळ कमी पडले. सत्तेत येण्यासाठी एकेका आमदाराचे महत्व भाजपला भासू लागले. त्यामुळे मुळच्या भाजपच्याच असलेल्या गीता जैन यांचा पाठींबा भाजपने त्यावेळी मागितला होता. जैन यांनीही भाजपलाच पाठींबा दिला होता ( MLA Geeta Jain was supported to BJP ).

परंतु निवडणुकीनंतर आता वर्षभराने गीता जैन यांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज दुपारी १२.३० वाजता त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मीरा भाईंदर महापालिका शिवसेनेकडे येण्याची चिन्हे

सध्या मीरा भाईंदर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पण गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास तेथील गणिते बदलतील अशी शक्यता आहे. भाजपचे बहुतांश नगरसेवक गीता जैन यांच्या विश्वासातील आहेत. त्यामुळे बरेच नगरसेवक गीता जैन यांच्यासोबत शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाले तर मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपची सत्ता शिवसेनेकडे जाऊ शकते असेही बोलले जात आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी