31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूज‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेनंतर भाजपाचे तोंड बंद आंदोलन - शिवसेना

‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेनंतर भाजपाचे तोंड बंद आंदोलन – शिवसेना

टीम लय भारी

मुंबई : भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. त्यावरून सभापतीं व्यंकय्या नायडू यांनी  उदयनराजे यांना सुनावले होते. त्यावरूनच चांगलेच राजकारण तापले आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपा व संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचं प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. असं ट्विट करुन प्रश्न भाजपला सवाल केला आहे.

राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी (२२ जुलै) पार पडला. यावेळी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सगळ्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. त्यावरून सभापतींनी त्यांना समज दिली. या मुद्यावरून आता भाजपावर टीका होऊ लागली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपा व संभाजी भिडे यांच्या टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचं प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली-सातार बंदची अद्याप घोषणा नाही… जय भवानी, जय शिवाजी,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

काय आहे प्रकरण…

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्यामुळे सभापती नायडू यांनी त्यांना समज दिली. शपथ घेतल्यानंतर उदयराजे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. त्यावर, हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही, अशी समज नायडू यांनी उदयनराजे यांना दिली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी