31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यधक्कादायक! अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीमुळे झाल्या रक्तामध्ये गाठी? 7 देशांनी वापर थांबवला

धक्कादायक! अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीमुळे झाल्या रक्तामध्ये गाठी? 7 देशांनी वापर थांबवला

टीम लय भारी

कोपेनहेगन : कोरोनाची अ‍ॅस्ट्राझिनेका ही लस (AstraZeneca Corona Vaccine) घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी (blood clots) तयार होत असल्याचे समोर येऊ लागल्याने युरोपच्याच सात देशांनी या लसीचा वापर करणे थांबविले आहे. 

कोरोना महामारीला रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अ‍ॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर करत आहेत. मात्र, या कंपनीची लस वादात सापडली आहे. विशेष म्हणजे, याआधी ऑस्ट्रियामध्ये 49 वर्षांच्या नर्सचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याने या देशाने अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस वापरणे बंद केले आहे. या नर्सचा मृत्यू तिच्या रक्तात गाठी तयार झाल्याने झाला होता.

डेन्मार्क, इटली आणि नॉर्वेसह एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया व लक्जमबर्ग या सात देशांमधील काही नागरिकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनू लागल्याचे समोर आले आहे. यामुळे या देशांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला असून या लसीच्या परिणामांवर चौकशी सुरु केली आहे.

युरोपियन मेडिसिन एजन्सीने सध्यातरी याबाबत कोणतेही संकेत सापडले नसल्याचे सांगितले.

डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीने सांगितले की, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचा तपास सुरु आहे.

युरोपिय देश एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया व लक्जमबर्ग या देशांनीही कोरोना लसीकरण थांबविले आहे. 17 युरोपीय देशांपैकी 10 देशांना कोरोना लसीचा डोस पाठविण्यात आला आहे.

डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीचे संचालक सोरेन ब्रोसट्रॉम यांनी सांगितले की, आम्ही अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस वापरण्यास नकार दिला नसून तात्पुरत्या स्वरुपात वापर थांबविला आहे. आमच्याकडे लस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

धक्कादायक म्हणजे अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस ही पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूटदेखील बनविते. भारतातही लस घेतल्यानंतर जवळपास 40 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, भारत सरकारने या लोकांचा मृत्यू लसीमुळे झाला नसल्याचे म्हटले आहे. या मृत लोकांना आधीपासूनच दुर्धर आजार होते, असे स्पष्ट केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी