33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशनउद्धव ठाकरे, जयंत पाटील रमणार बालपणीच्या शाळेत

उद्धव ठाकरे, जयंत पाटील रमणार बालपणीच्या शाळेत

टीम लय भारी

मुंबई : माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला बालपणीच्या आठवणी सुखावह वाटतात. शाळकरी जिवनातील आठवणी तर प्रत्येकाच्याच मनात रूंजी घालत असतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील या दिग्गजांना सुद्धा आपल्या शाळेबद्दल ओढ आहे. म्हणूनच मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री आज आपल्या शाळेमध्ये जाणार आहेत.

मुंबईच्या दादर येथील बालमोहन विद्यामंदिरात उद्धव ठाकरे व जयंत पाटील या दोघांचेही शालेय शिक्षण झाले आहे. आता या दोघांनीही राज्याच्या उच्च पदावर भरारी घेतली आहे. या भावनेतून बालमोहन विद्यामंदिरच्या वतीने आज (सोमवारी) अभिमान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिमान सोहळ्यात दोन्ही मंत्र्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांचे शालेय शिक्षण बालमोहनमध्ये झाले आहे. नंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे उच्च शिक्षण जे. जे. कला महाविद्यालयातून पूर्ण केले, तर जयंत पाटील यांनी त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण माटुंग्याच्या ‘वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थे’तून (व्हीजेटीआय) पूर्ण केले. पाटील यांनी पंधरवड्यापूर्वी एका सोहळ्याच्या निमित्ताने व्हीजेटीआयला भेट दिली होती. त्यावेळी ते जुन्या आठवणींमध्ये रमले होते. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जेजेमध्ये अनेकदा भेट दिली आहे.

बालमोहनने आयोजित केलेल्या अभिमान सोहळ्यामुळे ठाकरे व पाटील हे दोन्ही दिग्गज मंत्री एकाच शाळेत शिकल्याची माहिती सामान्य लोकांच्या समोर पहिल्यांदाच आली आहे. ठाकरे व पाटील शाळेत येणार असल्याने शाळेमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण आहे. आज, सोमवारी दुपारी १२ वाजता हा सोहळा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंच्या पावलावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचेही पाऊल

वाढदिवसानिमित्त मंत्री एकनाथ शिंदे यांचे अनोखे समाजकार्य; हृदयाला छिद्र असलेल्या १०० मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करणार

Super EXCLUSIVE : धनंजय मुंडेंनी पंतप्रधान कार्यालयाचा अनागोंदी कारभार आणला चव्हाट्यावर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी