33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवारांचे राम मंदीराबातचे वक्तव्य योग्यच

उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवारांचे राम मंदीराबातचे वक्तव्य योग्यच

टीम लय भारी

मुंबई : सध्या सगळी प्राथनास्थळे, मंदीरे बंद आहेत. देव मंदिरात नाही. तो डॉक्टरांच्या रूपाने रूग्णांची सेवा करीत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी राम मंदिरांच्या बाबतीत केलेले विधान योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे ( Uddhav Thackeray depends Sharad Pawar’s statement ).

‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी हे मत व्यक्त केले. या मुलाखतीचा पहिला भाग शनिवारी प्रसिद्ध झाला आहे.

राम मंदिर बांधले तर ‘कोरोना’चे निर्मूलन होईल असे काहीजणांना वाटत असल्याचा टोला शरद पवार यांनी नरेंद्र मोदी व त्यांच्या समर्थकांना लगावला होता ( Sharad Pawar’s statement on Ram Mandir ). त्या अनुषंगाने राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर ठाकरे यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचे समर्थन केले.

रूग्णांना वेळेवर उपचार मिळणे, औषधे मिळणे गरजेचे आहे. हे काम डॉक्टर करीत आहेत. त्यामुळे तेच देव आहेत. डॉक्टर पाहीजेत. नुसत्या सुविधा असून चालणार नाही. रूग्णाच्या बेडच्या बाजूला डॉक्टर आणि नर्स पाहीजे. औषधे पाहीजेत. देव म्हणतो, मी तुमच्यातच आहे. तुम्ही मंदीरात येऊ नका ( Uddhav Thackeray said, Doctors are real god in corona pandemic) .

माझे आजोबा प्रबोधन ठाकरे यांनी गाडगेबाबांची एक गोष्ट सांगितली होती ( Uddhay Thackeray’s interview ). गाडगेबाबा पंढरपूरच्या वारीला जायचे. ते मंदिरात जायच्या ऐवजी ते चंद्रभागेचा काट खराट्याने साफ करायचे. ही गोरगरीब जनता हाच माझा विठोबा आहे असे गाडगेबाबा म्हणायचे. अस्वच्छता, रोगराई पसरू नये म्हणून गाडगेबाबा साफसफाई करायचे. आठवणीच्या स्वरूपात मी आजोबांकडून हे सगळे ऐकल्याच ठाकरे म्हणाले.

‘लॉकडाऊन’ला लोक कंटाळले आहेत. तो उठवा असे लोकांचे म्हणणे आहे असा सवाल राऊत यांनी केला. त्यावर ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊनमधून एकेक बाब आपण सोडवत चाललो आहे. पण घाईने लॉकडाऊन करणे चूक आहे, तसेच तो घाईने उठवणे सुद्धा चूकच आहे. लोक कंटाळले आहेत, पण त्यांचा कंटाळा घालवण्यासाठी लॉकडाऊन उठवणे योग्य ठरणार नाही ( Uddhav Thackeray said, Lockdown will never finish immediately ).

भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी नाव घेता टीका केली ( Uddhav Thackeray scathing to BJP and Devendra Fadnavis ). विरोधी पक्ष ही फार जबाबदार संस्था आहे. दीड महिन्यांपूर्वी सर्व पक्षांच्या नेत्यांची मी बैठक घेतली होती. आताही परत बैठक घेणार आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते, आपली काही निरीक्षणे असतील. काही सुधारणा सुचवायच्या असतील तर त्या मोकळेपणाने सुचवा.

Mahavikas Aghadi

राजकारण आपल्या पाचवीलाच पुजले आहे. सदासर्वदा राजकारण एके राजकारण सुरू आहे. पण सध्या जनतेच्या जिवाशी खेळ होत चालला आहे. एकाद्या कोविड सेंटरमध्ये दुरावस्था असू शकेल. ती नाही असे मी म्हणणार नाही. असेल तर ती सुधारली पाहीजे. ही सुविधा जनतेसाठी आहे.

म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहीजे. विरोधासाठी विरोध नको. कुठे काही उणिवा असेल तर ती दूर केलीच पाहीजेत, असाही सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

केंद्राकडून ३८ हजार कोटी आले का, या प्रश्नावर ते म्हणाले की, हळूहळू येत आहेत. सगळ्यांचे उत्पन्न घटले आहे. तसे केंद्राचेही घटले आहे. पंतप्रधान वेळावेळी बैठका घेतात. मदतही करतात.

राज्याचा महसूल वाढविण्यासाठी लगेच काही करता येणार नाही. ‘पी हळद आणि हो गोरी’ असे करता येणार नाही. या सगळ्या गोष्टी हळूहळू पुर्ववत होतील अशी आशा ठाकरे यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

Lockdown 5.0 : शरद पवारांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरेंकडून ‘लॉकडाऊन’ शिथील होण्याची शक्यता

CHECKMATE : रश्मी ठाकरे यांच्या इच्छेमुळे उद्धव ठाकरेंना मिळाले मुख्यमंत्रीपद

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कणखरपणामागे कार्यरत आहे पडद्यामागील ‘खास माणसां’ची फौज

मी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधत आहे. मी जनतेसी नातं तुटू दिलेलं नाही. त्यांच्या सोबत महाराष्ट्र सरकार खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटात आहे, हे मी सांगण्याचा प्रयत्न केला.

जनता माझ्यावर विश्वास ठेवते आहे. सरकारचे ऐकते आहे. जनता सोबत असेल तर कोणत्याही ताण तणावाची चिंता करण्याची गरज नाही. लोकांचा विश्वास मला बळ देत आहे. मी बऱ्याच दिवसांनंतर काल केस कापले. नाहीतर मी स्वतःच घरी केस कापत होतो. आत्मनिर्भर होतो.

काही संकट अशी असतात की, त्यात खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनासारख्या संकटात लोकं मृत्यूमुखी पडतात. वादळ, भूकंप अशी संकट एका क्षणात होत्याचे नव्हते करतात. संकटात सापडललेल्या लोकांचे पुनर्वसन करावे लागते.

निसर्ग च्रकीवादळात आपण अगोदरच काळजी घेतली होती. त्यामुळे कमीत कमी प्राणहानी झाली. पण फळबागांचे नुकसान झाले. घरांचे नुकसना झाले. विजेचे खांब उन्मळून पडले.

‘कोरोना’ कधी संपणार हे कळत नाही. हे महायुद्ध आहे. हे खरंच विश्वयुद्ध आहे. या आजाराने संपूर्ण जग व्यापून टाकले आहे. ज्यांनी लॉकडाऊन उठवला, ते परत लॉकडाऊन करीत आहेत. ऑस्ट्रेलियात तर सैन्य बोलविण्याची वेळ आली.

महाराष्टात कधी सैन्य बोलविण्याची वेळ आली नाही. कोणतीही साथ कितीजणांनी कवेत घेऊन जाईल हे सांगता येत नाही. मध्यंतरी मुंबईत रूग्णांसाठी खाटांची कमतरता होती. रूग्णवाईक नव्हत्या. औषधे नव्हती. व्हेंटिलेटर नव्हते. ऑक्सीजनची साधने नव्हती.

आपल्याकडे आतापर्यंत असलेली रूग्णालये होती, तेवढीच होती. मार्चमध्ये विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होते, तेव्हा पहिला रूग्ण सापडला. अधिवेशन एक आठवडा कमी करावे लागले. तेव्हाच मी सांगितले होते, आपल्याला फिल्ड हॉस्पीटल्स सुरू करावी लागतील.

गरज लागली तर मिलिटरी तंत्रज्ञानाची गरज घ्या असे मी म्हटले होते. कारण मिलिटरी ते तातडीने उभे करतात. याही बाबतीत लष्कराची मदत लागली नाही. आपल्या प्रशासनाची टीम उत्तमरित्या तत्परेतेन काम करीत आहे. चीनने १५ दिवसांत हॉस्पीटल उभे केले होते. आपणही १५ ते २० दिवसांत हॉस्पीटल उभे केल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

Laybhari appeal

आपण मंत्रालयात जात नाही या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, आता तंत्रज्ञानात प्रगत आहे. मंत्रालय बंद होते. तंत्रज्ञानाचा वापर करता आला नाही, तर तुमच्यासारखे अभागी तुम्हीच. आज मी घरी जाऊन मुंबई महापालिकेच्या सर्व आयुक्त, सह आयुक्तांची बैठक घेणार आहे. काल मी मराठवाड्यातील सर्व आमदारांची बैठक घेतली. शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. परवा सर्व पक्षांच्या आमदारांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी घरात बसूनही सगळीकडे जाऊ शकतो. मी संपूर्ण राज्यात तंत्रज्ञानाच्या आधारे पोहोचू शकतो. आणि निर्णय घेतोय. जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा एकाच ठिकाणी जाता. पण व्हिडीओ कॉन्फरन्समुळे सर्व ठिकाणी जाता.

तंत्रज्ञानाचा वापर करायचा नसेल तर मग विमानातून कशाला जाता ? बैलगाडीतून जा. पायी चालत जा. सध्या लॉकडाऊन आहे. सभा समारंभ बंद आहेत. जनतेमध्ये मिसळणे म्हणजे आपला नियम आपणच तोडण्यासारखे आहे.

मी मुख्यमंत्री आहे. मला सोशल डिस्टन्शिंगची अडचण येणार नाही. पण माझ्यासमोर जनता दाटीवाटीने बसली तर त्यांना धोका आहे. जनतेशी अशा पद्धतीने संवाद साधून त्यातील कोणी आजारी पडले तर नुकसान होईल. म्हणून मी नियमांचे पालन करीत आहे.

त्यासाठी एकदम लॉकडाऊन उठवला आणि साथ वाढली तर काय करणार ? कारखान्यांमध्येही साथ घुसली तर मग काय करणार ? कितीही माणसे मेली तरी चालतील पण ‘लॉकडाऊन’ उठवा असे म्हणून चालणार नाही. मी डोनाल्ड ट्रम्प नाही. माझ्या डोळ्यासमोर माझी माणसे तळमळताना मी पाहू शकत नाही.

पदवी परीक्षेच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतला आहे. मुलांनाही कोरोना होतो. शिक्षण हे जिवनाश्यक आहे. शाळा संकल्पना बाजूला ठेवून शिक्षण सुरू करावे. ग्रामीण भागात शाळा सुरू करता येतील. पण शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू करावे असा आम्ही विचार करीत आहोत. मी टीकेची पर्वा करीत नाही. जिथे जनतेचे हित आहे. तेच मी करतो.

राज्यपाल, विद्यापीठ अनुदान आयोग व कुलगुरूंची ठराविक भूमिका आहे. परीक्षा व्हावी असे मलाही वाटते. म्हणूनच आतापर्यंत झालेल्या विविध परीक्षांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना गुण द्यावेत, अशी माझी भूमिका आहे.

परंतु ज्याला परीक्षेला बसायचे आहे तो बसू शकतो. पण परिस्थितीत सुरळीत झाल्यानंतर अशी इच्छा असलेले विद्यार्थी परीक्षा देवू शकतील.

नोटबंदीमुळे बेरोजगारीचा फटका महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला बसला पण त्यावर कुणी बोलत नाही. मानवी आणि अमानवी संकटे असतात. आताचे संकट अमानवी आहे. कोरोना बाहेरून आला. यातून मार्ग काढण्यासाठी जग धडपडत आहे.

औषधांचा शोध लावला जात आहे. त्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. ऑगस्टपर्यंत औषध येईल असे काहीजण सांगतात. पण डिसेंबर अखेरपर्यंत भारतात कोरोनावरील औषध येईल अशी मला खात्री आहे.

हे संकट सर्वव्यापी आहे. केवळ शेतकरी किंवा विशिष्ट वर्गावरतीच हे संकट नाही. सगळ्यांवरच संकट आहे, असे ठाकरे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी