31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयBreaking : पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Breaking : पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत ( Uddhav Thackeray transferred 5 IAS officers ). यात मुख्य सचिवांच्या कार्यालयातील उप सचिव किरण पाटील यांचाही समावेश आहे.

कुटुंब कल्याण आयुक्त अनुप कुमार यादव यांची बदली विशेष विक्रीकर आयुक्त पदावर करण्यात आली आहे. विद्यमान विशेष विक्रीकर आयुक्त परिमल सिंग यांची बदली कुटुंब कल्याण आयुक्तपदावर करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपच्या आमदाराचा ‘कोविड’ सेंटर आवारात धिंगाणा

VIDEO : राज्याचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ठाकरे सरकारचे धडाकेबाज निर्णय : उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी ‘लय भारी’ला दिली Exclusive माहिती

शिर्डी संस्थांचे मुख्य कार्य अधिकारी ए. के. डोंगरे यांची बदली मुंबई दुरूस्ती व पुनर्वसन मंडळाच्या मुख्याधिकारी पदावर करण्यात आली आहे. किरण पाटील यांची बदली रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.

मार्केटिंगचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे यांची नियुक्ती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी पदावर करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी