31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजविमानात प्रवाशाची तब्येत बिघडली, केंद्रीय मंत्र्याने केले उपचार

विमानात प्रवाशाची तब्येत बिघडली, केंद्रीय मंत्र्याने केले उपचार

टीम लय भारी

औरंगाबाद : केद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुन्हा एकदा आपल्या कामातून माणुसकी दाखवली आहे. भागवत यांनी विमान प्रवासादरम्यान बेशुद्ध पडलेल्या एका प्रवाश्यावर प्राथमिक उपचार केले आहेत. कुठलाही प्रोटोकॉल विचारात न घेता एक डॉक्टर म्हणून त्यांनी उपचार केले आहेत (Union Minister showed humanity).

खर म्हणजे डॉ. भागवत हे इंडिगो विमानाने दिल्लीहून-मुंबईमार्गे औरंगाबादला येत होते. त्यावेळी दिल्ली विमानतळावरून विमानाने ‘ टेक ऑफ’ केले. मात्र त्या वेळी अचानक एक प्रवाशी रक्तदाब वाढल्याने बेशुध्द होऊन आपल्या आसनावरच कोसळला.

BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’

BJP : भाजपाला पोस्टरबाजी आली अंगलट ! पोस्टरवरील ‘तो’ शेतकरीच करतोय दिल्लीत आंदोलन

Union Minister showed humanity on the plane
डॉ. भागवत कराड

त्यामुळे विमानात एकच गोधंळ उडाला. तो सर्व गोंधळ पाहुन भागवत यांनी आपण डॉक्टर असल्याचे सांगत बेशुध्द पडलेल्या प्रवाश्यावर प्राथमिक उपचार केले आहेत.

BJP : निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा भाजपमध्ये सूर

BJP to retain UP with significant reduction in number of seats: Poll

भागवत यांनी या आधीही औरंगाबादेत रस्त्यावर रिक्षा उलटलेली, तेव्हा मंत्रिपदाचा वाव न आणत त्यांनी जखमी मुलावर जागीच प्राथमिक उपचार केले होते. त्यानंतर त्यांनी स्व:ताच्या गाडीतून त्या मुलाला रूग्णालयात भरती केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी