32 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरराजकीयमी औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार ! इम्तियाझ जलील

मी औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार ! इम्तियाझ जलील

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असे नामकरण करण्यास केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने या दोन्ही शहरांची नावे बदलण्याची अधिसूचना जारी केली. यापुढे ही दोन्ही शहरे नव्या नावाने ओळखली जाणार आहेत. मात्र, या नामांतराला ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयाचा इम्तियाज जलील यांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला आहे. याविरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषादेखील त्यांनी केली होती. औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर या नामकरणावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला असून अद्यापही आपण या शहराचे नाव औरंगाबाद असेच गृहीत धरत असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. ते म्हणाले, “इम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार होते आणि औरंगाबादचेच खासदार राहतील. माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार.” (I was born in Aurangabad and will die in Aurangabad!)

I was born in Aurangabad and will die in Aurangabad

‘एमआयएम’च्यावतीने राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी या नामकरणाला प्रखर विरोध दर्शवला. ते म्हणाले, की, “इम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार होते आणि औरंगाबादचेच खासदार राहतील. काही जण औरंगाबादचे नामांतर करण्यात आल्यानंतर उड्या मारत आहेत. पण, माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार.”

एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचादेखील नामांतरला विरोध असल्याचे इम्तियाझ जलील यांनी यावेळी सांगितले. ही नामांतरे करण्याआधी स्थानिकांच्या भावनांचा विचार सत्ताधाऱ्यांनी केला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात न घेताच परस्पर हे नामांतर करण्यात आलं आहे. नाव बदलून औरंगाबादचा विकास होणार आहे का? शहरातील नागरिकांना दोन वेळ पुरेसे पाणी मिळणार आहे का? असे सवालही असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केले आहेत.

हे सुद्धा वाचा

एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्या सुरक्षेत वाढ

एमआयएमच्या गुंडांचा आरटीआय कार्यकर्ते नदीम राणांवर प्राणघातक हल्ला!

कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत राडा : भाजपच्या माजी नगरसेवकाचा मतदारावर हल्ला

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी